माझा वाघ गेला, 'गोल्डमॅन'च्या आठवणीने राज ठाकरे गहिवरले!पुणे : नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा येथे सभा झाल्यानंतर, राज ठाकरे यांचा मोर्चा पुण्याकडे वळला. पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडगोळीवर तुटून पडताना, राज ठाकरे आज भावूक झाले. राज यांचे एकेकाळचे सहकारी आणि ‘गोल्डमॅन’ म्हणून प्रसिद्ध झालेले मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे अक्षरश: गहिवरले.
“खडकवासल्यात आल्यानंतर माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही, माझा वाघ गेला, तो आता असायला पाहिजे होता”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या गहिरवरल्या काळजाला वाट मोकळी करुन दिली. राज ठाकरे यांनी रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर, उपस्थित लोकही काहीसे शांत झाले.

रमेश वांजळे हे राज ठाकरे यांचे एकेकाळचे सहकारी होते. ज्यावेळी एकाच फटक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले होते, त्यात एक रमेश वांजळे होते. अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे वांजळेंना अवघा महाराष्ट्र ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखत असे. कट्टर राज ठाकरे समर्थक म्हणूनही वांजळेंची महाराष्ट्राला ओळख होती. रमेश वांजळे यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget