आंबा चोरांचा सुळसुळाट, गुरखे करताहेत राखण, कॅनिंग व्यवसायही ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात

Image result for आंबा

रत्नागिरी : या वर्षी बदलत्या वातावरणाचा फटका आंबा बागायतदारांना बसल्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आहे. बदललेल्या हवामानाचा फटका कॅनिंग व्यवसायालाही बसला आहे. बाजारातील आवक कमी असल्याने आंबा उत्पादकांमध्ये चिंता आहे. यावर्षी कॅनिंगचे दर किलोमागे २८ रूपयांच्या घरात असून गतवर्षीच्या तुलनेत दर चार ते पाच रूपयांनी कमी आहेत. सध्या कॅनिंग हंगाम सुरू झाल्याने आता आंबा चोरांचाही सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना या चोरट्यांचाही फटका बसत आहे. मात्र, काही व्यापा-यांनी बागांमध्ये ठेवलेले गुरखे व घेतलेली खबरदारी यामुळे यालाही काही प्रमाणात आळा बसला आहे.

प्रारंभी चांगल्या प्रकारे थंडी पडली व आंबा फुटीला पोषक वातावरण निर्माण झाले. यामुळे यावर्षी आंबा पीक चांगले मिळणार असा अंदाज होता. मात्र, मधल्या काळात वातावरणात कमालीचा बदल झाला. वाढते तापमान आणि वादळी वारा व काही भागात पाऊसही पडला होता.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget