दहशतवादी तुमचे नातेवाईक लागतात का ? : अमित शहांचा सवाल




गाझीपूर : पाकिस्तानी दहशतवादी तुमचे नातेवाईक लागतात का, असा खडा सवाल भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना केला. ते गाझीपूर येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

बालाकोट येथे दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले, तेव्हा सारा देश जल्लोष करीत होता. मात्र पाकिस्तान आणि राहुल, मायावती आणि अखिलेश यांच्या कार्यालयांत शोक व्यक्त केला जात होता, अशी टीका त्यांनी केली.


पाकिस्तानचा एखादा दहशतवादी मरतो तेव्हा यांचा चेहरा का उतरतो ? हे दहशतवाद्यांचे चुलत – मामे भाऊ लागतात का, असा सवाल त्यांनी केला. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधान आहेत. आम्ही दहशतवाद्यांशी ‘इलू – इलू’ करू शकत नाही. या देशाच्या सुरक्षेशी कुणीही खेळू शकत नाही, असे शहा म्हणाले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget