बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटनेला खळबळजनक वळण

बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटनेला खळबळजनक वळण

नवी दिल्ली : बडगाममध्ये झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये हवाईदलाची चूक असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञ आणि भारतीय सैन्याचे निवृत्त कर्नल अजय शुक्ला यांनी केला आहे. तसेच ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तपासाचा अहवाल निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध न करण्यासाठी दबाव असल्याचेही त्यांनी सांगितले.

 याबाबत त्यांनी बिझिनेस स्टँडर्ड आणि आपल्या ब्लॉगमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. हवाई दलातील 2 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे आपण हे सांगत असल्याचेही अजय शुक्ला यांनी सांगितले. श्रीनगर एअर बेसवर संबंधित Mi-17V5 हेलिकॉप्टर पाकिस्तानचे असल्याचे समजून भारताकडून त्याच्यावर क्षेपणास्त्र डागले गेले. त्यामुळे ही दुर्घटना झाली. यात 6 पायलट आणि 1 नागरिक अशा एकूण 7 जणांचा मृत्यू झाला होता.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget