धक्कादायक! झोपाळ्यावरुन पडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू
पालघर : पालघरमध्ये झोपाळ्यावरुन पडून एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. पालघर नगरपरिषदेच्या बाळासाहेब ठाकरे उद्यानात खेळताना ही मुलगी झोपाळ्यावरुन खाली पडली. 


पण छातीला मार लागल्याने तिचा अंत झाला. ही मुलगी नवलीमधल्या साईबाग इथे राहत होती.

आज सकाळच्या सुमारास रविना समिरीया भुरीया(मूळ राहणार झाबुआ,मध्यप्रदेश) ही या उद्यानात आपल्या लहान भावासह खेळण्यासाठी आली होती. झोपाळ्यावर बसले असताना जोराने हिंदोळे देत असताना अचानक तिचा तोल गेला आणि त्यात ती खाली पडली. 

खाली पडल्यानंतर झोपाळ्याचा मार तिच्या छातीला लागला. नंतर ती नवली साईबाग इथल्या आपल्या घरी गेली. पण घरी कोणीही नसल्यामुळे घडलेला हा प्रकार कोणालाच समजला नाही. तिचे आई-वडील कामावर गेले होते.

त्यानंतर तिला छातीत दुखू लागल्याने ती विव्हळत होती. तिच्या लहान भावाने हे पाहिल्यानंतर त्याने आजूबाजूच्यांना आरडाओरडा करुन बोलावलं. शेजारी घरी आल्यानंतर ही मुलगी जिवंत होती, उपचारासाठी नेण्याच्या काही क्षणात तिचा मृत्यू झाला. 

तिला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. "तिचे शवविच्छेदन करण्यात येणार असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या मुलीसोबत काय झाले हे स्पष्ट होईल," अशी पोलिसांनी माहिती दिली

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget