आदिवासींना वनवासी बनवू पाहणाऱ्यांना सत्तेवरून घाली खेचा - छगन भुजबळ


नाशिक: आदिवासींना वनवासी बनवू पाहणाऱ्यांना सत्तेवरून घाली खेचा,असे आवाहन करताना आदिवासींच्या हक्कावर तीळमात्र गदा येऊ देणार नाही. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असा वश्विास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस मत्रिपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, ॲड. संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे, गोरख बोडके, फिरोज पठाण, रामदास घारे, उदय जाधव, धोंडीराम कोल्हे, लकी जाधव, सुनिल वाजे उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, राज्यातील शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यिासाठी शेतक-यांनी सेनेवर वश्विास ठेवला होता. मात्र सेनेने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले, असा आरोप करत भुजबळ यांनी मोदी सरकारवरही तोंडसुख घेतले. मोदी सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी झाला आहे. बारा हजाराहुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरुणांना रोजगार नसल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. देशात जाती धर्मात तेढ नर्मिाण करुन जातीय दंगली घडवण्यिाचा सरकारचा कट असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.  

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget