लोकशाही राहणार कि हुकूमशाही येणार हे ठरवणारी निवडणूक : राज ठाकरेमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्या जोडीने तुम्हाला गृहीत धरलं आहे. ही निवडणूक ह्या देशात लोकशाही टिकणार कि हुकूमशाही येणार हे ठरवणारी निवडणूक आहे हे विसरू नका. मोदी-शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठीची ही निवडणूक आहे हे विसरू नका आणि यांना लाथ मारून हाकलून द्या, अशी गर्जना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. शुक्रवारी सायंकाळी नाशिक येथे आयोजित जाहीर सभेत ते बोल्त होते.

यावेळी राज यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. सीबीआय, आरबीआय, सुप्रीम कोर्ट सारख्या स्वायत्त संस्थांवर नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण अंकुश आणला आहे. जे हिटलर करत होता तेच मोदी करत आहेत. व्यापारी हा सैनिकांपेक्षा अधिक शूर असतो असं मोदी म्हणाले होते. ही जवानांबद्दलची पंतप्रधानांना आस्था. प्रग्या ठाकूर म्हणाल्या की शहीद हेमंत करकरे, माझ्या शापाने ही लोकं गेली.अशा बाईंना तुम्ही लोकसभेचं भोपाळमधून तिकिट देता, इतकंच नव्हे तर त्यांच्या विधानाचं समर्थन मोदी-शाह करत आहेत, असे म्हणत राज यांनी घणाघात केला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget