पनवेलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पैसे वाटणारा अटकेतपनवेल (रायगड) : पनवेलमधील सुकापूर येथील गोकुळधाम भागात पैसे वाटप करताना आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रताप आरेकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडे पार्थ पवार यांची स्लीप आढळून आली आहे.

सुकापुर येथील गोकुळधाम येथे आज दुपारी प्रताप आरेकर याला अटक करण्यात आली. या प्रताप आरेकरकडे मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रावादी काँगेसचे पार्थ पवार यांची स्लीप आढळून आली आहे. तसेच, 200 रुपयांची 29 पाकिटेही प्रताप आरेकरकडून जप्त करण्यात आली आहेत. प्रताप आरेकर हा पार्थ पवारांसाठी काम करत असल्याचा संशय बळावला आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे कर्मचारी पथक अधिक चौकशी करत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. पनवेल भागातून निवडणूक आयोगाच्या पथाकने आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. कालच (27 एप्रिल) कामोठे येथे शेकाप आणि राष्ट्रवादीच्या दोन जणांना अटक करण्यात आली होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget