सत्ता आल्यानंतर मोदी, फडणवीस सरकारच्या घोटाळयांची चौकशी करणार : पृथ्वीराज चव्हाण

Image result for पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : मुंबईचा डीपी प्लान दोनदा बदलून या देवेंद्र फडणवीस सरकारने दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आमचे सरकार आल्यावर राफेलसह मोदी, फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. याशिवाय नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुंबईत झालेले एखादे मोठे काम दाखवून द्यावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. तसेच एकनाथराव गायकवाड यांच्या रुपाने एक अनुभवी उमेदवार काँग्रेस महाआघाडीने या मतदारसंघात दिला असून गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

चेंबूर येथे झालेल्या या सभेला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुलवामाचा हल्ला हे कारगिलप्रमाणेच आपल्या गुप्तचर संस्थेचे अपयश असल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले की, कारगिल युद्ध समाप्तीनंतर वाजपेयींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. वाजपेयींसारखी हिम्मत मोदी दा‌खवणार का, असा सवाल करत हे सरकार उलट शहिदांच्या हौतात्माचे राजकारण करून मते मिळवू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारच्या जुमलेबाजीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget