करमाड ठाण्याच्या हद्दीत दोन अपघातांत दोन जण ठार


करमाड: मामाकडे दुचाकीवरून आलेला पंचविशीतील युवक दुचाकी घसरून गंभीर जखमी झाला असता बुधवारी उपचार सुरू असताना मरण पावला. दुसऱ्या एका घटनेत बुधवारी दुपारी जालना महामार्गावर शेंद्रा एमआयडीसीच्या लीभेर चौकालगत पायी जाणाऱ्या पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेस अज्ञात दुचाकीने धडक दिली. उपचार सुरू असताना ती मरण पावल्याची घटना घडली. 


प्रदीप सुलिंदर कोरडे (रा. करमाड, ता. जि. औरंगाबाद) हा करमाड येथून मंगळवारी (दि. २३) सायंकाळी पाच वाजता करमाड येथे आपले मतदान करून शेंद्रा एमआयडीसीतील गोकुळवाडी वस्तीवर राहत असलेल्या मामाला भेटण्यासाठी आला होता. 

त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास करमाडकडे परत निघाला असता बँक ऑफ बडोदा जवळच्या चौकाजवळ त्याची दुचाकी (एमएच २० ईए ४८८१)घसरून त्याच्या डोक्याला जबर मार लागला. 

त्याला तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget