बेकायदा मच्छीमारी रोखण्यासाठी मस्यविभागाला स्वखर्चाने गस्ती नौका देणार : आ. नितेश राणे यांचे ट्विटसिंधुदुर्ग : माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमाऱ्यांचे परजिल्ह्यातील नौका येऊन नुकसान करतात. गेली पाच वर्ष सत्तेत असलेले नेते गस्ती नौका देण्याचे नुसतेच आश्वासन देत आहेत. गस्ती नौकाही मिळत नाही आणि बेकायदेशीर मासेमारीलाही आळा बसत नाही. सामान्य मच्छीमारांचे होणारे नुकसान आणि बेकायदा मासेमारी थांबण्यासाठी मत्स्य खात्याला आम्ही स्वखर्चातून गस्ती नौका लवकरच भेट देणार आहोत असे ट्वीट आ. नितेश राणे यांनी आज केले.

त्यांच्या ट्वीटमुळे पालकमंत्री आणि सत्तेतील आमदार तोंडघशी पडले आहेत. ‘देऊ तो शब्द पुरा करू’ हे ब्रीद घेऊन काम करणारे आ. नितेश राणे मत्स्य विभागाला नौका देतील आणि समुद्रातील आक्रमणे रोखली जातील असा विश्वास मच्छीमाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget