संपत्तीत हिस्सा नको म्हणून बहिणीची हत्या, गाडीत जळून मृत्यू झाल्याचा बनावसंपत्तीचे पैसे मागते म्हणून बहिणीची डोके आपटून हत्या केल्याची घटना पुण्यातील हिंजवडी भागात समोर आली आहे. आरोपी भावाने हत्या लपवण्यासाठी बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. 

तसेच त्यानंतर तिला रुग्णालयात नेताना मोटारीला आग लागून तिचा मृत्यू झाल्याचाही बनाव केला. संगीता मनीष हिवाळे असे हत्या झालेल्या बहिणीचे नाव आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत 8 महिन्यांनी अपघाताचा हा बनाव उघड झाला. याप्रकरणी आरोपी भावावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. संगीता हिवाळे यांचे पतीशी मतभेद असल्याने त्या मुलांसह आपल्या भावाजवळ राहात होत्या. 9 सप्टेंबरला रात्री 9 वाजताच्या सुमारास आरोपी भाऊ जॉन याचा पैशावरून बहीण संगीताशी वाद झाला. यावेळी जॉनने संगीताचे डोके जोरात फरशीवर आपटले. या घटनेत संगीताचा मृत्यू झाला. हत्येचा हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि बहिणीच्या विम्याचे 30 लाख रूपये मिळावेत म्हणून आरोपी जॉनने आपली आई व संगीताच्या मुलाला बोलावून संगीताला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले.

आरोपी जॉनने मुंबई-बंगळूर महामार्गावर सयाजी हॉटेलच्या पुढे निर्मनुष्य ठिकाणी गाडीमध्ये बिघाड झाल्याचा बहाणा केला. तसेच संगीता यांच्या मुलास बोनेट उघडून समोर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळी जॉनची आई लघुशंकेसाठी गेली होती. या संधीचा उपयोग करत आरोपी जॉनने बहिणीच्या अंगावर तसेच मोटारीमध्ये पेट्रोल टाकून लायटरने मोटार पेटवून दिली. त्यानंतर शॉर्ट सर्किटमुळे मोटारला आग लागली आणि त्यातच बहिणीचा मृत्यू झाल्याचे आरोपीने सर्वांना भासवले. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी जॉनने बहिणीची हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी जॉनला अटक केली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget