मूकबधिर तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षा


बीड । मूकबधिर तरुणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या हनुमंत विठोबा बांगर (२६) आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांनी दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा मंगळवारी (दि.१६) ठोठावली. शिरूर तालुक्यात २०१६ मध्ये हे प्रकरण घडले होते. पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणास वाचा फुटली होती. 

न्या. वाघ यांनी आरोपी हनुमंत बांगर यास १० वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच बलात्कार करताना पीडितेचा गळा आवळून मारहाण केल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा अशी शिक्षा ठोठावली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget