वीकेंड व १ मेच्या सुट्ट्यांमुळे मतदानांचा टक्का घसरणार ?

Image result for मतदान

मुंबई : वीकेंडच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकर व ठाणेकर बाहेर फिरायला गेले आहेत. त्याचा परिणाम सोमवारी (ता. २९ एप्रिल) होणा-या लोकसभेच्या मतदानावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईकर लोक मतदानाला मूळातच कमी बाहेर पडतात त्यातच आता वीकेंडच्या सुट्ट्या आल्याने उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे.

राज्यातील चौथ्या व अंतिम टप्प्यातील सोमवारी १७ मतदारसंघात मतदान होत आहे. यात नंदुरबार, धुळे, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, शिरूर, मावळ, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडीसह मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र, यातील बहुतांश मतदारसंघ शहरी भागातील आहे. त्यामुळे त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने २७ एप्रिल रोजी सुट्टी होती तर २८ एप्रिल रोजी रविवारची सुट्टी आहे. त्यानंतर सोमवारी २९ एप्रिल रोजी मतदान होत असल्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर ३० एप्रिल रोजी अनेकांनी सुट्टी टाकलेली आहे. कारण १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सार्वत्रिक सुट्टी आहे. त्यामुळे सलग चार-पाच दिवस सुट्टी येत असल्याने कडक उन्हाळ्यामुळे घामाघूम झालेले मुंबईकर बाहेर फिरायला गेले आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्थानके व खासगी गाड्या व कार यांचे सध्या जोरदार बुकिंग झाल्याचे दिसते. त्यामुळे ठाणेकर व मुंबईकर शहराबाहेर फिरायला गेल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सोमवारी होणा-या मतदानावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. यामुळे उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget