‘प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही’

Image result for प्रकाश आंबेडकर

मुंबई: “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही”, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला.

 मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकला. यावेळी मुणगेकर यांनी वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, आले तर प्रकाश आंबेडकर निवडून येतील, असा अंदाज वर्तवला.

भालचंद्र मुणगेकर म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी 48 जागी उमेदवार दिले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार उभे केले आहेत, ते केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी किंवा आघाडीची मतं कमी व्हावी यासाठीच आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या 48 उमेदवारांपैकी प्रकाश आंबेडकर सोडून कोणीही निवडून येणार नाही”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरत प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले राजकारण करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताला निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे, असं मुणगेकर म्हणाले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget