तीन तासांतच हॅकरचा बँकेलाच ६८ लाखांचा गंडा

कोल्हापूर : बँकेची ऑनलाईन पेमेंट सिस्टम हॅक करून जवळपास ६८ लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. 


कोल्हापूर अर्बन बँकेच्या ऑल लाईन पेमेंट सिस्टमचे वाभाडे काढत हॅकरनं तीन तासांत ६८ लाख रुपये लुटले आहेत. 

याबाबत बँकेत आयटी विभागाची जबाबदारी असलेले मुख्याधिकारी बाजीराव खरोशे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, कोल्हापूर पोलिसांचा सायबर क्राईम विरोधी विभाग हॅकर्सचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

कोल्हापूर अर्बन बँकेचे शाहुपुरीतील एचडीएफसी बँकेत करंट अकाऊंट आहे. या खात्यातूनच बँकेचे ऑनलाईन पेमेंटचे सर्व व्यवहार होतात. खात्यावरील दोन क्रमांकावरून आरटीजीएस, एनईएफटीचे सगळे व्यवहार केले जातात. 

शुक्रवारी बँकेला गुड फ्रायडेची सुटी होती. त्यादिवशी हॅकरने सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत बँकेची डिजिटल पेमेंट सिस्टमच हॅक करून तीन तासांत ६७ लाख ८८ हजार रूपये लुटले. बँकेला सुट्टी असल्यामुळे हा प्रकार लक्षात आला नाही. 

शनिवारी सकाळी बँक पुन्हा सुरू झाल्यानंतर बँकेतील अधिकारी शिल्पा मोहिते आणि मिनाक्षी लुकतुके यांच्या हा प्रकार लक्षात आला. 


चालू खात्यातून जवळपास ६८ लाख नाहीसे झाल्याचं लक्षात आल्यानंतर बँकेच्या आयटी विभागाची धावाधाव सुरू झाली. हॅकरने बँकेची सिस्टमच हॅककरून गंडा घातल्यानंच लक्षात आल्यानंतर बँकेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget