धनगर समाजाचा १ मे रोजी गिरगाव येथे गुंफण सोहळा

Image result for धनगर समाज

देवरुख : तरुणांनी धनगर समाजाला दिशा देण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र व्यापक ऋणानुबंध संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ऋणानुबंध सामाजिक संस्थेचा या वर्षीच्या गुंफण सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. १ मे रोजी गिरगावातील साहित्य संघ मंदिर येथे करण्यात आले आहे.

या गुंफण सोहळ्यासाठी अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. धनगर आरक्षण प्रश्नी चळवळ उभी करणारे धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना या सोहळ्यात उपस्थित धनगर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. गुंफण सोहळ्याच्या अध्यक्षपदी कॅबिनेट पदाचा दर्जा असलेले दक्षिण मुंबईतील भाजपचे आमदार राज के. पुरोहित असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. राजू जांगळे, जयसिंग तात्या शेंडगे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणा-या धनगर समाजातील मान्यवर मंडळींची उपस्थिती असणार आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget