...त्यांना लाज कशी वाटत नाही?


मुंबई: जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मसूद अजहरला सरकारी विमानाने सोडणाऱ्या आणि पठाणकोटमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या अधिकाऱ्यांचे पायघड्या घालून स्वागत करणाऱ्या भाजपला, काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानी आहे असे, म्हणताना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
पुण्याच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा आहे, का जैश ए मोहम्मदचे घोषणापत्र, असा सवाल उपस्थित केला होता. त्याचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतात अनेक हिंसक कारवाया घडवून शेकडो निरपराध लोकांचे बळी घेतले.

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करुन ४० जवानांची हत्या केली, त्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची डिसेंबर १९९९ मध्ये भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारनेच सुटका केली होती त्याचे फडणवीस यांना सोयीस्कर विस्मरण झाले, असे टोला चव्हाण यांनी लगावला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget