यूट्यूब व्हिडीओ पाहत असल्याच्या रागातून पत्नीची हत्या !

मुंबई : सोशल व्हिडीओ शेअरिंग साईट यूट्यूबवर व्हिडीओ पाहत असल्याच्या रागातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना अंधेरी एमआयडीसी परिसरात घडली आहे. 


आरती चौगुले असे मृत महिलेचे नाव आहे. पत्नी आरतीची हत्या केल्यानंतर पती चेतन चौगुलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर होत खुनाची कबुली दिली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चेतन चौगुले हा आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलासह एमआयडीसी कामगार वसाहतीमध्ये राहतो. 

पती- पत्नीमध्ये दररोज भांडणं व्हायची. भांडणं होण्याच्या इतर कारणांबरोबर यूट्यूब हे दोघांच्या भांडणांतील एक प्रमुख कारण होत.

चेतन सध्या काहीच कामधंदा करीत नव्हता. पती- पत्नीमध्ये दररोज भांडणं व्हायची. भांडणं होण्याच्या इतर कारणांबरोबर यूट्यूब हे दोघांच्या भांडणांतील एक प्रमुख कारण असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget