नगरमध्ये भिंत कोसळून तीन ठार; दोन भावांचा समावेशनक्षर / प्रतिनिधीः नगर शहरातील भाई सथ्था कॉलनी परिसरात नवीन इमारतीच्या बांधकामाच्या वेळी भिंतीचेही काम सुरू असताना लगतची जुनी भिंत कोसळून तीन मजूर ठार झाले. त्यात दोन भावांचा समावेश आहे. हे सर्व मजूर बुरुडगावचे आहेत.

या दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच कोतवाली पोषलस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


याबाबतची अधिक माहिती अशी, की सथ्था कॉलनीत महेश प्रकाश मुनोत यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी रोहन विजय फुलारे(वय-22) राहुल विजय फुलारे (वय-26), गोविंद शंकर शिंदे (वय-32, सर्व रा.बुरुडगाव, ता. नगर) हे तीन मजूर काम करत होते.

त्या वेळी अचानक निर्माणाधीन भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यानंतर तत्काळ तेथे पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने मलब्याखाली अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. एका गंभीर जखमीचे शासकीय रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान निधन झाले

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget