मी नाहीतर माझा मुलगा. नाही तर माझा पुतण्या. दुसऱ्यांना काही मुलं होत नाहीत का? - उद्धव ठाकरे



पुणे: मी नाहीतर माझा मुलगा. नाही तर माझा पुतण्या. दुसऱ्यांना काही मुलं होत नाहीत का? बारामतीची भानामती आता संपली आहे. मावळ ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली नाही.

संपूर्ण जिल्ह्यावर पवार कुटुंबांचा हक्क नाही, मावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळ्यांवर गोळीबार करणारे सरकार पाहिजे? तसेच  तुम्हाला मावळमध्ये मालक पाहिजे की सोबती. अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केला.

पाऊस पडत नाही तेव्हा आम्ही काय धरणात...असं बोलणार्‍याला तुम्ही तुमचे मत देऊ शकता का? असा ही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला

 मावळच काय राज्यात कोणीही दादागिरी करत असेल तर त्यांची दादागिरी मोडून काढा. या जिल्ह्यावर कुणाची मालकी नाही . पवारांनी आजपर्यंत पाडापाडीचेच राजकारण केलं आहे. तेच त्यांचं एकमेव काम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांची मावळमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी पवारांवर हल्ला चढविला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget