पैलवान नरसिंग यादवचं ACP पदावरुन निलंबनमुंबई : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाल्याने प्रसिद्ध पैलवान नरसिंग यादवचं सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरुन निलंबन करण्यात आलं आहे. 

मुंबईतील शस्त्र पोलिसात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणजेच एसीपी म्हणून कार्यरत होता. नरसिंग यादव याच्याविरोधात आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैलवान नरसिंग यादवने काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतल्याने, त्याच्यावर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर निवडणूक आयोगाने नरसिंग यादवची गंभीर दखल घेतली. 

अखेर त्याला पदावरुन निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र डीजीपींनी संबंधितांकडून माहिती घेऊन, नरसिंग यादवला नोटीस पाठवून, उत्तर मागवलं. त्यानंतर कारवाई केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget