... या अभिनेत्याने घेतली अमित शहांची भेट; 5 मिनिटांच्या भेटीत काय घडलं?

पुणे: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे एअरपोर्टवर बॉलिवूड अभिनेता सनी देओलची भेट घेतली. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांची ही भेट झाली. 


सनी देओल आणि अमित शहा यांची ही भेट अवघ्या काही मिनिटांसाठीच झाली. पण या भेटीनंतर सनी देओल लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

त्यामुळे आता हेमामालिनी यांच्यापाठोपाठ सनी देओल देखील भाजपच्या गोटात दिसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमित शहा आणि सनी देओल यांची भेट फक्त ५ मिनिटांसाठीच झाली. पण त्यानंतर सनी देओल हा पंजाबच्या अमृतसरमधून निवडणूक लढवू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

दुसरीकडे भाजपचे जिल्हा अध्यक्ष योगेश गोगावले यांनी अमित शाह आणि सनी देओल यांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण या भेटीनंतर नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget