48 जागांसाठी सरासरी 60.68 टक्के मतदान



मुंबई : महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 57 टक्के मतदान झालंय. 17 जागांसाठी हे मतदान झालं. राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. राज्यात एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 इतक्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी सांगितलं. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचं प्रमाण सारखंच आहे. पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघासाठी 63.46 टक्के, दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघांसाठी 62.88 टक्के, तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघांसाठी 62.36 टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील 17 मतदारसंघांमध्ये अंदाजे 57 टक्के मतदान झालं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget