‘नवी मुंबईच्या 28 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार’

Image result for निवडणुक

नवी मुंबई : गेल्या 30 वर्षांपासून नवी मुंबईमधील विस्तारीत गावठाणाचा आणि घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. कोणताही राजकीय पक्ष हे प्रश्न सोडवण्यास तयार नाही. याचा फक्त राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

नवी मुंबई शहर वसवण्यासाठी 1970 साली महानगर पालिका क्षेत्रातील 28 गावांची शेतजमीन, मोकळी जागा, गुरचरण जमीन मूळ गावठाण वगळून संपादित केली. परंतु गेल्या 40 वर्षांमध्ये या गावांचा गावठाण विस्तार केला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गरजेपोटी घरे बांधली. यात व्यावसायिक गाळेही आहेत. येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे आपली घरे अधिकृत करून त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळावे, अशी मागणी केली. मात्र, प्रत्येक राजकीय पक्ष याचा फक्त राजकीय फायदा घेत आहे. घरे अधिकृत करता येऊ शकत असतानाही यात राजकारण करुन ग्रामस्थांना वेठीस धरल्याने अखरे निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने सांगितले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget