2019 सालासाठी NIRF आणि ARIIA क्रमवारी प्रसिद्ध.भारतातल्या संस्थांची गुणवत्ता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी कार्यचौकट-2019’ (NIRF) हे दस्तऐवज तयार करण्यात आले आहे आणि संस्थांना दिलेली क्रमवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
8 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीत आठ संस्थांना भारतीय क्रमवारी पुरस्कार दिले गेलेत. ‘IIT मद्रास’ या संस्थेनी NIRF-2019 मध्ये एकूणच सर्व श्रेणींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

याशिवाय, अटल रॅंकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचीवमेंट्स (ARIIA) ही क्रमवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यात अग्र ठरलेल्या दोन संस्थांना ‘ARIIA पुरस्कार’ देण्यात आला. ARIIA या क्रमवारीमध्ये मिरंडा हाऊस कॉलेज (दिल्ली विद्यापीठ) या संस्थेनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भारतातल्या प्रथम पाच अभियांत्रिकी संस्था – IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT बॉम्बे, IIT खडगपूर, IIT कानपूर.

भारतातली प्रथम पाच विद्यापीठे – IISc बेंगळुरू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली), बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणशी), हैदराबाद विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ (कोलकाता).

भारतातली प्रथम पाच महाविद्यालये - मिरंडा हाऊस (दिल्ली), हिंदू कॉलेज (दिल्ली), प्रेसीडेंसी कॉलेज (चेन्नई), सेंट स्टीफेन्स कॉलेज (दिल्ली), लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन (नवी दिल्ली).
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget