महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान


Image result for मतदान
 

मुंबई : सर्वत्र सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या सोमवारी 29 एप्रिलला राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 

त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष, तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 332 तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. मतदानावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यातील 10 जागांवर, तर उत्तर महाराष्ट्रातील 7 जागांवर उद्या मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्वत्र कडकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे.

या लोकसभा मतदारसंघामध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रात सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू), तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आली आहेत.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget