चौकीदारच निघाला चोर 11 लाखांच्या दागिनाची चोरीचंदीगढ : सोसायटी, बँक, कंपनी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाते. मात्र चंदीगढमधील बॅंकेतील सुरक्षा रक्षकानेच एका महिलेचे 11 लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील स्थानिक लोकांचा सुरक्षा रक्षकांवरील विश्वास उडाला आहे.
पंचकुला सेक्टर 6 मध्ये राहणाऱ्या देविका महाजन 7 मार्चला मनीमाजरा जवळील ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्समध्ये दागिने ठेवण्यास गेल्या होत्या. मात्र देविका यांनी दागिने लॉकरमध्ये न ठेवता बाहेरच ठेवले आणि त्या लॉकर बंद करुन निघून गेल्या. त्यानंतर 13 मार्च रोजी त्या दागिने नेण्यासाठी पुन्हा बँकेत आल्या. मात्र देविका यांनी लॉकर उघडताच, त्यांना दागिने लॉकरमध्ये दिसेल नाहीत.

त्यानंतर देविका यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. मात्र कर्मचाऱ्यांनी याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र संतप्त झालेल्या देविका यांनी मनीमाजराजवळील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. देविका यांच्या चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 25 तोळे सोनं आणि एक हिऱ्याचा तोड्याचा समावेश असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget