April 2019काँग्रेस पक्षानं बॉक्सर विजेंदर सिंह याला दिल्लीच्या दक्षिण दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली आहे. विजेंदरला उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील सर्व सात जागांवरचे उमेदवार निश्चित झाले आहेत.

याआधी सोमवारी सकाळी काँग्रेसनं ६ उमेदवारांची नावं निश्चित केली होती. पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोठिया, नवी दिल्लीतून अजय माकन, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, उत्तर पूर्व दिल्लीतून शीला दिक्षीत आणि चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत.

दक्षिण दिल्लीमध्ये विजेंदर याचा लढा भाजपच्या रमेश बिधूडी आणि आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांच्याशी होणार आहे. दिल्लीमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे.

राजकारणात एन्ट्री केल्यानंतर विजेंदरनं ट्विट केलं की, बॉक्सिंगच्या माझ्या करिअरच्या २० वर्षांहून अधिक काळात मी नेहमीच माझ्या देशाला रिंगमध्ये सन्मानित केलं आहे.


माझ्या देशवासियांसाठी काही तरी करावं आणि त्यांची सेवा करण्याची आता वेळ आली आहे. मी या संधाची स्विकार करतो. काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे आभार मानतो.


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कट- पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये,
 जे वास्तव आहे तेच मांडा आणि नसेल जमत तर असे बोलू नका अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.


हरिसालचे वास्तव तेथील उपसरपंचांनी मांडल्यानंतर पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर तावडे यांनी ही टीका केली.

कॉंग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषण होत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरुध्द काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोक पैसे मिळविण्यासाठीच असे आरोप करतात असे निर्लज्जपणे सांगितले.

तावडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले की, आता आपल्याला राज ठाकरे यांना प्रश्न विचारायचा आहे की मोदी,शहा नको असे तुम्ही आवाहन जर करत असाल तर अशा प्रकारच्या लोकांना निवडुन देण्याचे आवाहन ते आपल्या जाहीर सभेत करणार आहेत का की अशा लोकांवर ते टीका करणार आहात याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे असेही तावडे यांनी स्पष्ट केले.


कणकवली : आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.

आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.निलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्‍वास खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यानी वरवडे फणसनगर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.याप्रसंगी त्यांच्या समवेत सौ.निलमताई राणे,सौ.प्रियांका राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदानाचा हक्क बजावण्यापुर्वी खास.नारायण राणे यानी वरवडे येथील आपल्या निवासस्थानी भेट देऊन देवदर्शन घेतले होते. नंतर मतदानस्थळी दाखल होत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

श्री.राणे म्हणाले, गेली ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.जिल्ह्याचा विकास करत असताना जात,पात,धर्म न मानता जिल्हा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम केले.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार निश्‍चितपणे डॉ.निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.कल्याण : कल्याणमध्ये भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला मुख्यमंत्री उशीरा आल्याने मुख्यमंत्र्यांनी भाषण तर केले, मात्र भाषणावेळी सभेतील खुर्च्या रिकाम्या होत्या. सभेला विलंब झाल्याने अनेक जणांनी वैतागून सभा सोडून जाणे पसंत केले.

या विजयी संकल्प सभेची वेळ ४ ची देण्यात आली होती. तर ५ वाजता मुख्यमंत्री येणार असे सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांना यायला सुमारे ७ वाजले. त्यामुळे सभा सुरु होण्यास तीन तास वेळ लागल्याने नागरिक वैतागले होते.


घरातील कामे आटोपून दुपारपासून अनेक गृहिणी सभा स्थळी आल्या होत्या. मात्र सायंकाळची घरची कामे, जेवण वैगैरे करायचे असल्याने दुपारपासून वाट पहात ताटकळत बसलेल्या या गृहिणींनी संध्याकाळी ७ नंतर आपल्या घरी जाणे पसंत केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.

डिसेंबर २०१८ ला पंतप्रधान मोदी यांनी कल्याणमध्ये जेव्हा सभा घेतली त्यावेळीही मोदींच्या भाषणा दरम्यान नागरिक निघून गेले होते.

तर अर्ध्याहून अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. तीच परिस्थिती आजच्या भाषणात पाहायला मिळाली. त्यामुळे भाषणाच्या दिवशी लागलेली ही गळती निवडणुकीच्या दिवशी पण लागणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरु होतीसंगमनेर ( प्रतिनिधी ) - 2014 मध्ये मोदींनी मोठ मोठी आश्‍वासने दिली. त्यापैकी एकही आश्‍वासन त्यांनी पुर्ण केले नाही. याउलट काँग्रेसने 70 वर्षात विकासाचे रचनात्मक राजकारण केले आहे. जाहिरातबाजी केली नाही. म्हणून ग्रामीण विकासासाठी पुन्हा कॉँग्रेसचे सरकार आवश्यक असून भाजपाचे सरकार हे ससवेगिरीचे सरकार हे फसवेगिरीचे असल्याची टीका शॅम्प्रोचे अध्यक्ष व जि.प.सदस्य रामहरी कातोरे यांनी केले आहे.

राजापूर, घुलेवाडी येथे आ.कांबळेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे, सिताराम राऊत,भाऊसाहेब कुटे, नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकर, के.के.थोरात, अभिजीत ढोले, नयना राहाणे, ललिता शिंदे, वंदना गुंजाळ, तुकाराम गुंजाळ, रामनाथ कुर्‍हे, पंढरीनाथ गुंजाळ,नरेंद्र गुंजाळ, जगन आव्हाड, नयना राहाणे आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी कातोरे म्हणाले कि, जनता आता भाजपा कार्यकर्त्यांना विचारत आहेत.अच्छे दिन चे काय झाले. ? खात्यात 15 लाख कधी येणार ? त्यांनी निवडणुकीपुरते दिलेले आश्‍वासन पूर्णता फसले आहे हे सरकार फसवणूकीचे आहे.त्यांच्याकडे कोणतेही ठोस धोरण नाही.ग्रामीण भागात शेती व शेतकर्‍यांचे मोठे प्रश्‍न आहे. भाजपा सरकार हे शेतकर्‍यांचे प्रश्‍न समजून घेत नाही. दुष्काळाची दाहकता वाढत असतांना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणाचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यांचेकडून ते होत नाही. लोकशाहीला मारक असलेल्या भाजप सरकारने अनेकांचे बळी घेतले आहे. हे सरकार आता रायघटनाच बदलू पहात आहे. रिझर्व्ह बँक,सीबीआय,न्यायालय,पत्रकारीता या क्षेत्रांवर त्यांनी निर्बंध्द लादले आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणार्‍या या सरकारला या निवडणुकीतून हद्दद्दपार करण्याची हीच खरी वेळ आहे. सांगत सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून आमदार भाऊसाहेब कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार कांबळे म्हणाले की, काँग्रेस पक्ष व आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर मोठा विश्वास टाकला असून चांगल्या कामातून आपण हा विश्वास सार्थ ठरवू मागील दहा वर्षात श्रीरामपूरचे आमदार असताना सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक काम केले. पारदर्शक, प्रामाणिक काम हीच परंपरा कायम ठेवून शिर्डी मतदार संघाचे नाव विकास कामातून देशात उवल करू. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकर्‍यांना सरसकट 72 हजार कोटींची कर्जमाफी केली. सर्वांना ती मिळाली. कायम शेतकर्‍यांना मदत केली. मात्र भाजपा सरकारने मोठी जाहिरातबाजी करुन कर्जमाफी केली परंतू खूप जाचक अटी टाकल्या.पती पत्नी घेवून दोन दिवस रांगेत उभे राहून ऑनलाईन फार्म भरले.परंतू 1 रुपयाही कर्जमाफी मिळाली नाही. भाजप सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूलथापा देवून शेतकर्‍यांना फसविले आहे. सर्वांनी विकासाचे सरकार आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

राहाता ( प्रतिनिधी ) - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना, मित्रपक्ष व आघाडीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी उपमुख्यमंत्री आ.छगनराव भुजबळ व आ.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बुधवारी दिंनाक 24 रोजी सायं 6.00 वा. विरभद्र मंदीर समोरील प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ.एकनाथ गोंदकर यांनी दिली आहे.


आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीची बुलंद तोफ असणारे छगन भुजबळ यांची भव्य जाहीर सभा प्रथमच राहातामध्ये होत आहे. शरहारातील विरभद्र मंदीराच्या प्रांगणात बुधवारी सायं. 6.00 वा. होणार्‍या या जाहीर सभेसाठी काँग्रसचे वरीष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात,उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे, आ.डॉ.सुधीर तांबे, मा.आ.भानुदास मुरकुटे, आशुतोष काळे, आ.वैभवराव पिचड, अविनाश आदिक , करण ससाणे, पाडूरंग पा. अभंग,नरेंद्र पा.घुले, कडूभाऊ कडिर्र्ले, रावसाहेब म्हस्के, विक्रांत दंडवते,सुरेंद्र खर्डे, बाळासाहेब विखे, सुधीर म्हस्के, सुभाष लोलगे, नंदुकुमार सदाफळ, सौ.लताताई डांगे,महेंद्र शेळके,राजेंद्र गाढे आदिंसह विविध मान्यवर व पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या सभेसाठी जास्तीत जास्त नागरिक, महिला व युवक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय व मित्रपक्षांनी केले आहे.


कोपरगांव ( प्रतिनिधी ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना, मित्रपक्ष व आघाडीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आ.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 24 रोजी दुपारी 2.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आशुतोष काळे यांनी दिली आहे.

आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भव्य जाहीर सभा प्रथमच कोपरगांवमध्ये होत आहे. 

या सभेसाठी रायाचे उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, काँग्रसचे वरीष्ठ नेते मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात,मा.आ.अशोकराव काळे,आ.डॉ.सुधीर तांबे, उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे,सत्यजीत तांबे, मा.आ.भानुदास मुरकुटे, आशुतोष काळे, आ.वैभवराव पिचड, अविनाश आदिक , करण ससाणे, पाडूरंग पा. अभंग,नरेंद्र पा.घुले, कडूभाऊ कडिर्र्ले, रावसाहेब म्हस्के, माधवराव खिलारी आदिंसह विविध मान्यवर व पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या सभेसाठी जास्तीत जास्त नागरिक, महिला व युवक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन, तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय व मित्रपक्षांनी केले आहे.

गणोरे : - प्रतिनिधी :- वर्धा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय चौथ्या सुपर क्रिकेट राज्यस्तरीय ज्युनियर चॅम्पियन शिप मध्ये गणोरे (ता.अकोले) येथील अथर्व चंद्रराव आहेर याने गोलंदाजी मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवुन सुवर्णपदक पटकवले आहे.त्याची गोवा येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुपर क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र राज्य सुपर क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने वर्धा येथे जिल्हा क्रीडा संकुलात चौथ्या सुपर क्रिकेट राज्यस्तरीय चॅम्पियन शिप चे १९ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या चॅम्पियन शिप मध्ये पाच संघाने सहभाग घेतला होता. अथर्व चंद्रराव आहेर हा अंबरनाथ संघाकडून खेळत होता.

याने पहील्या डावात दोन ओव्हर मध्ये पाच रन देऊन दोन विकेट घेतल्या तर दुसर्या डावात तीन ओव्हर मध्ये बारा रन देऊन तीन विकेट मिळवत त्याने एकाला झेल बाद करण्यात यश मिळवले. या चमकदार कामगिरी च्या जोरावर त्याने सुवर्णपदक मिळवल्याने ५ मे २०१९ रोजी गोवा येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी त्याची निवड झाली आहे.याबद्दल त्याला सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.त्याला प्रशिक्षक रविंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभले या यशा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.मुंबई : ‘अल्बमध्ये नाचणा-यांनी मला सांगू नये’ असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुगली टाकली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. एका जाहिर सभेत मुख्यमंत्र्यांनी ‘रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुळं’ असे म्हणत राज यांना टोला लगावला होता. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेबद्दल विचारले असता राज यांनी प्रत्युत्तर दिले. ‘द रिव्हर अँथम’ या अल्बममध्ये देवेंद्र फडणवीस सपत्नीक झळकले होते.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी महाराष्ट्रातील विविध भागात सभा घेतल्या. ‘मोदी मुक्त देश’ असा आक्रमक पवित्रा घेतलेल्या राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. राज यांची पहिली सभा नांदेड येथे झाली होती. यावरून मुख्यमंत्र्यांनी राज यांच्यावर टीका केली होती.जामखेड : मुबंई येथून लग्न समारंभ आटपून यवतमाळकडे परतणा-या व-हाडच्या लक्झरी बसचा अपघात झाला आहे. बसच्या पाठीमागुन आलेल्या मालट्रकने दिलेल्या जोराच्या धडकेने झालेल्या या अपघातात १७ जण जखमी झाले असून यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात सोमवारी पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवित हानी टळली.

मुंबईहून लग्न समारंभ आटपून यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या गावी परतणारया वरहाडी मंडळींच्या लक्झरी बसला शिर्डी हैद्राबाद मार्गावरील जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात हा अपघात झाला. अपघातग्रस्त लक्झरी बसला जामखेडहून पाटोदा मार्गे यवतमाळकडे जायचे होते. परंतु या बसचा रस्ता चुकल्याने ही बस शिर्डी हैद्राबाद मार्गाने चालली होती.

 बस जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात आली असता लक्झरी चालकाने बस थांबवून रस्ता विचारण्यासाठी तो खाली उतरला होता. दरम्यान याचवेळी जामखेडकडून खर्ड्याच्या दिशेने जाणारया मालट्रकने लक्झरी बस क्रमांक एम एच ०१ एएन ८०९७ला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत लक्झरीची पाठीमागील बाजुचा अक्षरशा: चुराडा झाला.

Image result for उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले धारावीत चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो. त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे. या अगोदर मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता आम्ही मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो. परंतु, मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी एवढ्या मोठ्या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढेल या हेतूने पाहिले जात होते.

 हे समजल्यावर उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे. असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी लगावला आहे.

‘डासभाऊ’ हा शोध लावणा-या उद्धव ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे याकरता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढवण्याकरीता जागतिक नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी सचिन सांवत यांनी केली आहे. सावंत म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या या शोधामुळे वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. 

डासांचा नायनाट करण्यासाठी या अगोदर कासवछाप अगरबत्ती सह विविध उत्पादने वापरुन डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना पायबंद कसा घालता येईल याकडे जनतेचा प्रयत्न असायचा परंतु, डासांचा एवढा महान उपयोग असू शकतो हे कळल्यानंतर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावना सारख्या महान उद्देशांसाठी आता या उत्पादनांवर बंदी घालायलाच हवी. परंतु नोबेल पुरस्कारासाठी अडथळा निश्चित आहे. एकच डास दोन व्यक्तींना चावल्याने त्यांच्यात बंधूभावाचे नाते तयार होते, असे उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगतिले.मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात १४ मतदार संघामध्ये मतदान होणार असून २४९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या टप्प्यात २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. 

तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

तिसऱ्या टप्प्यात २४९ उमेदवारांमध्ये १९ महिला उमेदवार असून बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी ३१ उमेदवार असून सर्वात कमी ०९ उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव (१४), रावेर (१२), जालना (२०), औरंगाबाद (२३),रायगड (१६), बारामती (१८), अहमदनगर (१९), सांगली (१२), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (१२), कोल्हापूर (१५) व हातकणंगले (१७) उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

Image result for एकनाथ गायकवाड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून मुस्लिम व दलितांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बाब हे दोन्ही समाज विसरले नसून गेल्या पाच वर्षांत माजलेल्या या धर्मांध शक्तीला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी दलित व मुस्लीम काँग्रेसच्या पाठिशी उभे राहतील असा, विश्वास दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

गायकवाड म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये संपुर्ण बहुमताने भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तथाकथित धर्मरक्षकांनी कायदा हातात घेत दलित आणि मुस्लीमांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. गोमांस बाळगल्याच्या संशय असो किंवा लव्ह जिहाद, आंतरजातीय विवाहासारख्या क्षुल्लक कारणास्तव २०१५ सालापासून आतापर्यंत या धर्मरक्षकांनी जवळपास ९० पेक्षा अधिक जणांना मॉब लिंचींगद्वारे ठार केले आहे. उत्तरप्रदेशातील दादरी, अलिगढ, हापूड, गुजराममधील उना, राजस्थानातील अलवर, पश्चिम बंगालमधील जलपायगुडी असो किंवा बिहारमधील बेगुसराय; प्रत्येक ठिकाणी दलित आणि मुस्लिम समाजातील व्यक्तींचा हकनाक बळी गेला आहे.

 या अतिशय गंभीर मुद्द्यावर भाष्य करताना गायकवाड म्हणाले की, गेल्या पाच वर्षांतील ही सर्व पार्श्वभुमी लक्षात घेता मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा पराभव करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि दलित तसेच मुस्लीम समाज हा राजकीय आणि सामाजिक जाणीवा जागृत असलेला समाज आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत आपल्यावरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी तसेच भाजपचा पराभव करण्यासाठीच हे दोन्ही समाज संपुर्ण ताकदीने काँग्रेसच्या पाठिशी उभे राहतील, असे ते म्हणाले.मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदार संघामध्ये मतदान होणार असून 249 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार असून बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी 31 उमेदवार असून सर्वात कमी 09 उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23),रायगड (16), बारामती (18), अहमदनगर (19), सांगली (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15) व हातकणंगले (17) उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

या टप्प्यासाठी 56 हजार 025 बॅलेट युनिट तर 35 हजार 562 कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तसेच 37 हजार 524 व्हीव्हीपॅट यंत्रे सुद्धा या चौदा मतदार संघात देण्यात आली आहेत. या टप्यातील प्रक्रियेसाठी एकूण 1 लाख 41 हजार 113 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, 17 हजार 192 कर्मचाऱ्यांना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात एकूण 1 कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.

Image result for विनोद तावडे

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळु सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

शरद पवार यांच्या प्रचाराच्या भाषेबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आज उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, शरद पवार सध्या बुथ वरच्या सामान्य कार्यकर्त्यालाही फोन करुन माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर या प्रकारची भाषा वापरत आहेत, याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांचे बारामतीमध्ये काही खरे नाही. हे बहुधा त्यांना कळले असावे असा टोलाही त्यांनी मारला.

शरद पवार यांच्या मुलीचे काय होईल, अजितदादांच्या मुलाचे काय होईल ? मुलायम सिंह यांच्या मुलाचे काय होईल ? याचा विचार करु नका, तर आपल्या मुला बाळांचे काय होईल याचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करुन लोकांनी मतदान करावं असे आवाहन करताना, या राजकीय नेत्यांनी आपा-आपल्या मुला-बाळांसाठी भरपुर संपत्ती गोळा करुन ठेवलीय. त्यामुळे आपापल्या मुलांचे भले करायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्वच निवडून दिल पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.नवी दिल्ली ( वृत्तसंस्था)

कॅनरा बँक ही देशातली सार्वजनिक क्षेत्रातली पहिली बँक आहे, ज्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) ठरवून दिलेले EMV मानदंड पूर्ण केले. ATM जाळ्याच्या माध्यमातून सध्या केल्या जाणार्‍या व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्‍या कार्डसाठी EMV चिप आणि पिन या सुरक्षा योजना योजल्या गेल्या आहेत.

ACI वर्ल्डवाइड या संस्थेनी अशी घोषणा केली की, कॅनरा बँकेनी देशभरातले त्याचे ATM जाळे आणि आधारचे प्रमाणीकरण तसेच ACIच्या UP रिटेल पेमेंट्स सोल्यूशनचा लाभ घेण्यासाठी EMV कार्डला समर्थन देणारी नवीन कार्यक्षमता यशस्वीरित्या अंमलात आणली आहे.

RBIने परंपरागत चुंबकीय पट्टी असलेल्या कार्डला बदलण्यासाठी EMV चिपचा वापर करण्यास 31 डिसेंबर 2018 ही अंतिम मुदत ठरविण्यात आली होती. गहाळ आणि चोरी झालेल्या कार्डमार्फत होणारी फसवणूक तसेच बनावट कार्डची प्रकरणे कमी करणे हा या मागचा उद्देश आहे.
तुमचे जीवन फक्त तुमचेच आहे असे नाही,जर तुम्ही जीवनाला कंटाळून जीवन संपविण्याचा विचार,प्रयत्न करत असाल तर थांबा...तुमच्या जीवनावर तुमच्यासोबत इतरांचाही अधिकार आहे आणि त्यांचे जीवनही अवलंबून आहे.तुमच्यानंतर पाठीमागे असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींचे काय हाल होतील याचा विचार करा.जेव्हा हक्काचा माणूस जातो तेव्हा संकटे,अडचणी ह्या वाढतात,समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन खालच्या पातळीवर जाऊन ठेपतो.क्षणाच्या त्रासापायी आयुष्य संपविणारे,आयुष्यभरासाठी आपल्या कुटुंबाला दुःखाच्या खाईत खितपत पडण्यासाठी सोडून देतात.खूप विचित्र दुनिया आहे ही,स्वार्थासाठी पायात घुटमळणारे,स्वार्थ संपला की ओळखही विसरतात.तुमच्या पाठीमागे तुमचे कुटुंब सुखी,समाधानी राहील याची व्यवस्था नक्की करा.एक लक्षात असू द्या,आपले वाटणारे लोक संकटकाळी आपले नसतात.तुमच्या आयुष्याच्या आधारावर अनेकांची जीवन नौका तरंग घेत असते.ती डुंबायची की पैलतीरी न्यायची हे तुम्ही ठरवायचे आहे.संसारगाडा ओढताना खूप अडथळे येतात,ते येउद्या पण त्याने खचून जाऊ नका,आयुष्य हे वारंवार मिळणारी गोष्ट नाही ते ऐवढ्यात संपविण्याचा विचार करू महापाप करू नका.ऐकवेळ तुमचे कुटुंब डोळ्यासमोर आणा,वय झालेले वृद्ध आईवडीलांचा विचार करा आणी मग काय निर्णय घ्यायचा तो घ्या.लक्षात असू द्या तुमचे कुटुंब हे तुमच्यावर निर्भर आहे,त्यांच्या भविष्याचा विचार करा.तुमच्या जीवनावर उदार होऊन एका क्षणात तुमच्या जीवनावर अधिकार असणाऱ्या कुटुंबाला परकं करू नका...!

तुषार उत्तमराव दाभाडे.
९९६०९२३३७७


संगमनेर (प्रतिनिधी ) काँग्रेसचे स्टार प्रचारक व प्रदेश उपाध्यक्ष मा.खा.नाना पटोले,आ.बाळासाहेब थोरात व युवा नेत्या सक्षणा सलगर यांची एकत्रित जाहिर सभा मंगळवार दि.23 एप्रिल रोजी सायं 5 वा.साकूर येथे होत असल्याची माहिती सभापती शंकर पा.खेमनर यांनी दिली आहे.

शिर्डी मतदार संघातील काँग्रेस,राष्ट्रवादी व आघाडीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ साकूर बाजारतळ येथे सायं 5 वा. ही भव्य सभा होत आहे.

 या सभेसाठी मा.खा.नाना पटोले,धनगर समाजाच्या युवा नेत्या व प्रभावी वक्त्या सक्षणा सलगर, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आ.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे,आ.वैभव पिचड, आ.भाऊसाहेब कांबळे, बाजीराव पा.खेमनर यांच्यासह,इंद्रजित खेमनर,किरण मिंडे,अजय फटांगरे, आबासाहेब थोरात आदि विविध उपस्थित राहणार आहे.

तरी या सभेसाठी पठार भागातील जास्तीत जास्त नागरिक,महिला,युवक व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुरोगामी आघाडी व मित्र पक्षांच्यावतीने करण्यात आले आहे. चौकट मा.खा.नाना पटोले हे केंद्रीय कृषी आयोगाचे मा. अध्यक्ष असून पंतप्रधान मोदींच्या शेतकरी विरोधी धोरणात प्रथम विरोध करुन त्यांनी देशात आवाज उठवला.सध्या नागपूर मध्ये लोकसभेची उमेदवारी करुन पक्षात चैतन्य निर्माण केले असून पक्षाध्यक्ष खा.राहुल गांधी यांची केरळ मधील वायनाड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सांभाळत आहे.

महाराष्ट्रातील युवा नेत्या सक्षणा सलगर यांची तरुणांमध्ये मोठी क्रेझ असून त्यांच्या भाषणांना जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.यु ट्युब वरील त्यांची भाषणे लोकप्रिय ठरत असून संगमनेर तालुक्यातील साकूरमध्ये प्रथमच उपस्थित राहणार आहेत.बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना यंदा बिग बॉसच्या घरात कोणाकोणाचा समावेश असणार याची उत्सुकता लागली होती. 


आज शोचे होस्ट महेश मांजरेकरांनी बिग बॉस चा पहिला प्रोमो (बिग बॉस मराठी २ प्रोमो) शेअर करत त्याची हिंट दिली आहे. राजकीय प्रचाराची धामधूम यंदा बिग बॉसच्याही घरात दिसणार आहे.

खुद्द महेश मांजरेकर राजकारण्याच्या वेषात पहायला मिळाले आहेत. शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी… आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का च्या घरात वर्दी? 

बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्या प्रोमोनुसार यंदा घरात राजकारणातील एखादी व्यक्ती दिसणार अशी शक्यता वाढली आहे. आता ही व्यक्ती कोण असेल ? याचा अंदाज रसिक लावतीलच पण लवकरच हे नाव कोण असेल याचा उलगडा होणार आहे.

सोलापूर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच टोला लगावला. शरद पवारांनी अकलूज येथे झालेल्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी ‘चड्डी’वरून टीका केली होती. 


त्याला उत्तर देतांना, ‘ज्या चड्डीवरुन तुम्ही बोलत आहात, त्याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात, हे विसरु नका’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या २३ एप्रिलला होणार आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज इथल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. 

“भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल?” असा टोला विजयसिंह मोहिते पाटील यांना लगावला होता.
पालघर : पालघरमध्ये झोपाळ्यावरुन पडून एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. पालघर नगरपरिषदेच्या बाळासाहेब ठाकरे उद्यानात खेळताना ही मुलगी झोपाळ्यावरुन खाली पडली. 


पण छातीला मार लागल्याने तिचा अंत झाला. ही मुलगी नवलीमधल्या साईबाग इथे राहत होती.

आज सकाळच्या सुमारास रविना समिरीया भुरीया(मूळ राहणार झाबुआ,मध्यप्रदेश) ही या उद्यानात आपल्या लहान भावासह खेळण्यासाठी आली होती. झोपाळ्यावर बसले असताना जोराने हिंदोळे देत असताना अचानक तिचा तोल गेला आणि त्यात ती खाली पडली. 

खाली पडल्यानंतर झोपाळ्याचा मार तिच्या छातीला लागला. नंतर ती नवली साईबाग इथल्या आपल्या घरी गेली. पण घरी कोणीही नसल्यामुळे घडलेला हा प्रकार कोणालाच समजला नाही. तिचे आई-वडील कामावर गेले होते.

त्यानंतर तिला छातीत दुखू लागल्याने ती विव्हळत होती. तिच्या लहान भावाने हे पाहिल्यानंतर त्याने आजूबाजूच्यांना आरडाओरडा करुन बोलावलं. शेजारी घरी आल्यानंतर ही मुलगी जिवंत होती, उपचारासाठी नेण्याच्या काही क्षणात तिचा मृत्यू झाला. 

तिला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. "तिचे शवविच्छेदन करण्यात येणार असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या मुलीसोबत काय झाले हे स्पष्ट होईल," अशी पोलिसांनी माहिती दिली


नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लोहणेर गावातील वाळूमाफिया आणि तडीपार गुंड स्वप्निल निकम उर्फ मिरच्या भय्या याचे ऑफीस गावकऱ्यांनी जाळून टाकले आहे. 

मिरचा भय्याने गावातील एका विधवा महिलेचा विनयभंग केला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी निकमच्या (मिरच्या) निषेधार्थ बंदची हाक दिली होती. या बंदने हिंसक वळण घेतले आहे. बंददरम्यान संतप्त नागरिकांनी या गुंडाचे ऑफीस जाळले आहे.

स्वप्निल निकम (मिरचा भैय्या) हा गेल्या दोन वर्षांपासून तडीपार आहे. तडीपार असूनही तो गावात आला होता. यावेळी त्याने आर्थिक देवाण - घेवाणीदरम्यान एका विधवा महिलेचा विनंयभंग केला. 

त्याच्या या कृत्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद ठेवला आहे. बंददरम्यान संतप्त ग्रामस्थांनी मिरचा भय्याचे ऑफिस तोडून नंतर जाळून टाकले. त्यानंतर गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोकं फिरलंय का? असा प्रश्न जानकर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी उपस्थित केला. 


एका देशात दोन पंतप्रधान तुम्हाला मान्य आहे का? संविधान आणि तिरंगा जाळला त्यावर गुन्हा दाखल करु नये? हे ही मान्य आहे का? मग शरद पवारांच्या पक्षाला कसं काय मान्य आहे. त्यांचं डोकं फिरलंय का? अशी टीका जानकरांनी केली

"मी ब्रह्मचारी आहे. देवाच्या साक्षीने सांगतो. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून आले आहेत. फक्त मताधिक्य किती देताय हे सांगा," असं धक्कादायक विधान राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे.

शिरुर विधानसभा क्षेत्रात रांजणगाव येथे प्रचारावेळी महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केलं. ब्रह्मचारी आहेत हे पटवून देण्यासाठी त्यांनी लग्न न केल्याचा आणि घर-दार नसल्याचा दाखला दिला. शिवाय यासाठी आईची शपथ घ्यायला ही ते विसरले नाहीत.

कोल्हापूर : बँकेची ऑनलाईन पेमेंट सिस्टम हॅक करून जवळपास ६८ लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. 


कोल्हापूर अर्बन बँकेच्या ऑल लाईन पेमेंट सिस्टमचे वाभाडे काढत हॅकरनं तीन तासांत ६८ लाख रुपये लुटले आहेत. 

याबाबत बँकेत आयटी विभागाची जबाबदारी असलेले मुख्याधिकारी बाजीराव खरोशे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, कोल्हापूर पोलिसांचा सायबर क्राईम विरोधी विभाग हॅकर्सचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

कोल्हापूर अर्बन बँकेचे शाहुपुरीतील एचडीएफसी बँकेत करंट अकाऊंट आहे. या खात्यातूनच बँकेचे ऑनलाईन पेमेंटचे सर्व व्यवहार होतात. खात्यावरील दोन क्रमांकावरून आरटीजीएस, एनईएफटीचे सगळे व्यवहार केले जातात. 

शुक्रवारी बँकेला गुड फ्रायडेची सुटी होती. त्यादिवशी हॅकरने सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत बँकेची डिजिटल पेमेंट सिस्टमच हॅक करून तीन तासांत ६७ लाख ८८ हजार रूपये लुटले. बँकेला सुट्टी असल्यामुळे हा प्रकार लक्षात आला नाही. 

शनिवारी सकाळी बँक पुन्हा सुरू झाल्यानंतर बँकेतील अधिकारी शिल्पा मोहिते आणि मिनाक्षी लुकतुके यांच्या हा प्रकार लक्षात आला. 


चालू खात्यातून जवळपास ६८ लाख नाहीसे झाल्याचं लक्षात आल्यानंतर बँकेच्या आयटी विभागाची धावाधाव सुरू झाली. हॅकरने बँकेची सिस्टमच हॅककरून गंडा घातल्यानंच लक्षात आल्यानंतर बँकेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Image result for बच्चू कडू

जालना : चंबलचे डाकू लुटालूट करून सोडून द्यायचे परंतु, रावसाहेब दानवेंनी सत्तेच्या काळात लूट केली. त्यासह विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर चोरी, दरोडे, बलात्कार यासारखे खोटे गुन्हे दाखल करायला लावले. त्यांना समाजातून उध्वस्त केले. यामुळे चंबलच्या डाकूपेक्षाही दानवे खतकरनाक आहेत. त्यांचा पराभव करणे हाच उद्देश आहे. असा दावा आमदार बच्चू कडू यांनी जालना येथे पत्रकार परिषदेत केला.
जालना लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांना पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेची पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू, अन्नदाता शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयाजी सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार कडू यांनी दानवेंच्या जुलमी, हेकेखोरी आणि विरोधकांवर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. दानवे सतत शेतकर्‍यांच्या विरोधात गरळ ओकतात, त्यांना विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांवर सत्तेचा गैरवापर करून चोरी, दरोडे, बलत्कार यासारखी खोटे गुन्हे दाखल करतात. या सर्व प्रकारात शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर असेच गुन्हे दाखल करण्यात आले. सेनेचे ना. अर्जुन खोतकर यांच्यासह काही नेते दानवेंनी जरी मॅनेज केले असतील मात्र शिवसैनिक आजही दानवेंना पराभूत करणार असल्याचा दावा आ. कडू यांनी केला.

Image result for सुरेश धस

जामखेड : अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची अन कसोटीची आहे. मिळालेल्या मंत्रीपदाचे त्यांनी आजवर सोने केले आहे. राम शिंदे यांचा सन्मान टिकण्यासाठी, सुजय विखे यांच्या जागी राम शिंदेच उमेदवार आहेत असे समजून जामखेडच्या जनतेने भाजपाला मतदान करावे असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार सुरेश धस यांनी जामखेड येथील बाजारतळ परिसरात आयोजित सभेत बोलताना केले.
महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे, व आमदार सुरेश धस यांची बाजारतळावर प्रचार सभा पार पडली. यावेळी सुर्यकांत मोरे, रविंद्र सुरवसे, सुनिल साळवे, रविंद्र कोठारी, सुभाष आव्हाड, भगवान मुरुमकर, सुधीर राळेभात, सोशल मिडीयाप्रमुख उध्दव हुलगुंडे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, मनोज कुलकर्णी सोमनाथ राळेभात, विलास मोरे, युवक नेते लहु शिंदे, जामखेड तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


कोलंबो : श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याने श्रीलंका हादरले. तीन हॉटेल, तीन चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला असून १७० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी २१ एप्रिलला स्थानिक वेळेनुसार सकाळी पावने आठ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बॉम्बस्फोटात शेकडोहून अधिक जण जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. या प्रकारामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे.

Image result for प्रकाश आंबेडकर

सांगली : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना का वाटते? भारताचा पंतप्रधान कोण असावा हे ठरविणारे इम्रान कोण? इम्रानच्या वक्तव्यावर मोदी- शहा काहीच का बोलत नाहीत, पण हे लोक बोलणार नसतील तर आम्ही यांच्या भेटीगाठी आणि संबंध उघड करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीत आंबेडकर यांची शनिवारी रात्री जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले की, देशातील भाजपचे सरकार व नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली आहे. मोदी एकीकडे देशातील दहशतवाद संपविल्याच्या बाता मारत आहेत तर दुसरीकडे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देत आहे. असे करून भाजपने देशातील शहिदांचा अवमान केला आहे. तसेच लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Image result for विनायक राऊत

लांजा : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये उद्ध्वस्त झालेल्या लांजा बाजारपेठेतील छोटेमोठे व्यापारी, टपरीचालक, हॉकर्स आणि भाडेकरू व्यावसायिक यांच्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता तसेच त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून न देता उलटपक्षी अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनाच सहकार्य करण्यास सांगणा-या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल नाराजी असून त्यांना ही नाराजी भोवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर या चौपदरीकरणामध्ये संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असल्याने आणि ९० टक्के बाजारपेठ विस्थापित होणार असल्याने या छोट्या मोठ्या व्यापा-यांना पर्यायी जागा उपलब्ध क रून देण्यात यावी तसेच त्यांना मोबदला मिळावा अशी मागणी या महामार्ग बाधित व्यापा-यांकडून केली जात होती. 

त्यानुसार लांजा तालुका व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष खलिल मणेर, जयवंत शेट्ये व अन्य प्रमुख पदाधिकारी यांनी या छोट्या- मोठ्या व्यावसायिकांसह खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. सत्ताधारी पक्षाचे खासदार या नात्याने विनायक राऊत हे येथील व्यापा-यांची भूमिका समजावून घेऊन त्याबाबत केंद्राकडे बाजू मांडतील अशी भाबडी आशा या व्यापा-यांना होती.

 कारण राऊत हे कोकणातील आणि या भागाचे खासदार असल्याने आणि ते सत्ताधारी पक्षाचे असल्याने केंद्रात हा प्रश्न मांडतील आणि आपल्याला अपेक्षित असे काहीतरी घडेल असा व्यापा-यांचा व्होरा होता. मात्र खासदार राऊत यांनी हा प्रश्न पोटतिडकीने शासनदरबारी मांडणे सोडाच परंतु त्यांनी याबाबत व्यापारी वर्गालाच महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले

Image result for पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : मुंबईचा डीपी प्लान दोनदा बदलून या देवेंद्र फडणवीस सरकारने दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आमचे सरकार आल्यावर राफेलसह मोदी, फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. याशिवाय नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुंबईत झालेले एखादे मोठे काम दाखवून द्यावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. तसेच एकनाथराव गायकवाड यांच्या रुपाने एक अनुभवी उमेदवार काँग्रेस महाआघाडीने या मतदारसंघात दिला असून गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

चेंबूर येथे झालेल्या या सभेला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुलवामाचा हल्ला हे कारगिलप्रमाणेच आपल्या गुप्तचर संस्थेचे अपयश असल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले की, कारगिल युद्ध समाप्तीनंतर वाजपेयींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. वाजपेयींसारखी हिम्मत मोदी दा‌खवणार का, असा सवाल करत हे सरकार उलट शहिदांच्या हौतात्माचे राजकारण करून मते मिळवू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारच्या जुमलेबाजीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

Image result for narayan rane

कणकवली : आम्हाला कोकणच्या जनतेचे ऋण फेडायचे आहे. आम्ही येथील भूमिपूत्र आहोत. आम्ही कोकणचे भूमिपूत्र असल्यानेच कोकणचे ऋण फेडणे हा आमचा धर्म आहे. आम्ही जातपात मानत नाही. माणुसकी हाच आम्ही धर्म मानतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची सेवा करणे, या जिल्ह्यांचा विकास करणे, येथील जनतेला सुखी समाधानी करणे हे आमचे ध्येय आहे. 

यावेळची निवडणुक अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे हे विजयी होऊन खासदार झाल्यानंतर आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय रहाणार नाही. आम्ही जो शब्द देतो तो पूर्ण करतो. आम्ही शिवसेनेप्रमाणे थापा मारत नाही. दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण न करणारा शिवसेना हा पक्ष आहे. म्हणूनच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठबळ द्या, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे ६० हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा आपला अंदाज असल्याचे खा. नारायण राणे यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

खा. नारायण राणे पुढे म्हणाले, निवडणुक प्रचारात प्रारंभापासूनच आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आणि आम्ही यापूर्वी केलेली विकासकामे यावरच आम्ही जास्त भर दिलेला आहे आणि आम्ही केलेल्या विकास कामांवरच आम्ही मते मागितली आहेत. १९९० पासून आम्ही जो विकास केला. १९९० पूर्वी येथील रस्ते, पाणी, आरोग्य तसेच येथील शैक्षणिक अवस्था काय होती याकडे आम्ही लक्ष्य वेधले आणि १९९० नंतर आम्ही कशा प्रकारे सुधारणा केल्या. शाळागृहे बांधली, येथील शैक्षणिक दर्जा सुधारला. येथील एसएससी आणि एचएससीचा ३५ टक्केच्या दरम्यान असलेला निकाल आम्ही ८२ ते ८७ टक्क्यांवर नेला. येथे दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्या. महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यातील तोडीचे इन्फ्रास्ट्रक्चर बनविले. 

मी राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री असताना जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले. मोठमोठे प्रकल्प आणले, मी मंजुर करुन घेतलेला केंद्र व राज्य सरकारचा १५०० कोटींचा सी-वर्ल्ड प्रकल्प पूर्ण झाला असता तर हजारो तरुणांना रोजगार मिळाला असता. साडेचार हजार कोटी गुंतवणुकीचे रेडी बंदर प्रकल्प मी मंजुर करुन घेतला. परंतु तो बंद करण्याचे कारस्थान शिवसेनेच्या मंत्र्यांनी केले. त्याला सुप्रिम कोर्टात आव्हान दिल्यानंतर आता त्याचे काम सुरु होत आहे. ओरोस येथे आयटी पार्क, आडाळी एमआयडीसी मंजुर करुन त्यामध्ये ५०० कारखाने उभारण्यासाठी साडे सहाशे एकर जमिन संपादीत केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला मी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना आणि निलेश राणे खासदार असताना २०१४ पूर्वीच मंजुरी मिळविली होती. मात्र २०१४ मध्ये सत्ता बदल झाल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचे टेंडर काढून कॉन्ट्रॅक्ट दिले. मात्र महामार्ग चौपदरीकरणाला आम्हीच मंजुरी मिळवून दिली होती.


सातारा : ""या सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली, त्यांच्या हातात पाच वर्षात हातात वाडगं दिलं", अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शिवसेना-भाजप सरकारवर टीका केली आहे.

या सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली, त्यांच्या हातात पाच वर्षात हातात वाडगं दिलं", अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शिवसेना-भाजप सरकारवर टीका केली आहे. सातारा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही उदयनराजेंनी उत्तर दिलं आहे. 'तुम्ही निधी दिला परंतू मी त्याचा पाठपुरावा केला म्हणून तुम्ही कामं केली' अशा शब्दात उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिले.

"या सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली, त्यांच्या हातात पाच वर्षात हातात वाडगं दिलं. गरिबांचं उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा हिरावून घेतलं. तसेच निवडणुका लागल्या की यांच्याकडे भरभरुन पैसे असतात.

आमच्या गाड्या चेक केल्या तर शिळ्या भाकरी मिळतील. परंतू तुम्हाला ज्या गाडीवर कमळ दिसेल त्या गाडीत मी तुम्हाला पैसे शोधुन देतो", असंही उदयनराजे म्हणाले.

पुणे: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे एअरपोर्टवर बॉलिवूड अभिनेता सनी देओलची भेट घेतली. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांची ही भेट झाली. 


सनी देओल आणि अमित शहा यांची ही भेट अवघ्या काही मिनिटांसाठीच झाली. पण या भेटीनंतर सनी देओल लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

त्यामुळे आता हेमामालिनी यांच्यापाठोपाठ सनी देओल देखील भाजपच्या गोटात दिसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमित शहा आणि सनी देओल यांची भेट फक्त ५ मिनिटांसाठीच झाली. पण त्यानंतर सनी देओल हा पंजाबच्या अमृतसरमधून निवडणूक लढवू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

दुसरीकडे भाजपचे जिल्हा अध्यक्ष योगेश गोगावले यांनी अमित शाह आणि सनी देओल यांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण या भेटीनंतर नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.मालेगाव : चौकीदार प्रामाणिक आहे मग राफेलची कागदपत्रे चोरीस कशी गेली? याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे अन्यथा राफेलच्या किंमतीमध्ये घोटाळा झाला आहे असे कबुल केले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत जनता घोटाळेबाजांना वैतागली असून यंदा परिवर्तन अटळ आहे. कॉग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार निवडणुकीनंतर नश्चिति स्थापन होईल असा स्पष्ट निर्वाळा  राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांनी दिला.

धुळे लोकसभा मतदार संघाचे कॉग्रेसचे उमेदवार आ. कुणालबाबा पाटील यांचे प्रचारासाठी मालेगाव संगमेश्वर व निमगांव येथे आयोजित केलेला जाहीर सभांना मार्गदर्शन करताना आ. भुजबळ यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. जल्हिा कृषी संघाचे अध्यक्ष डॉ.अद्वय आबा हिरे पाटील सभांच्या अध्यक्षस्थानी होते. कॉग्रेसचे जल्हिाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जल्हिाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, प्रसाद हिरे, काशीनाथ पवार, डॉ.जयंत पवार, गिसाकाचे माजी चेअरमन विजय रामजी पवार, शांताराम लाठर, धर्मा अण्णा भामरे, गुलाबराव चव्हाण, भगवान आढाव, नगरसेवक नंदकुमार सावंत, वाय.के.खैरनार, जवानसिंग मोरकर, नरेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.नागपूर : उमरेडच्या आमगाव देवळी येथील वुद्धाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह २० ते २५ किमी. अंतरावरील बेला भागातील पुलाखाली फेकून देण्यात आला. ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येमुळे उमरेड भागात एकच खळबळ उडाली असून दोन दिवसांनंतरही आरोपीचा शोध घेण्यास नागपूर जल्हिा ग्रामीण पोलिसांना यश आले नाही. काशीनाथ लक्ष्मण मोहुर्ले (६०, रा. आमगाव देवळी, ता. उमरेड) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशीनाथ मोहुर्ले हे १६ एप्रिलपासून घरून बेपत्ता होते. १८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बेला गावापासून ७ किमी. अंतरावरील जुनी खापरी रिठी शिवारातील पुलाखाली मृतावस्थेत आढळून आले. त्यांचे दोन्ही पाय बांधले होते व पाठीवर शस्त्राचे वार होते. 

काशीनाथ यांचे बाहेर कुठेतरी अज्ञात आरोपींनी दोन्ही पाय बांधले व गळा आवळून आणि पाठीवर शस्त्राचे वार करून खून केला व नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने  जुनी खापरी रिठी शिवारातील पुलाखाली फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काशीनाथ यांचा मृतदेह त्यांच्या गावापासून सुमारे २० ते २५ किमी. अंतरावर फेकण्यात आला आहे. याप्रकरणी बेला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.


नाशिक: आदिवासींना वनवासी बनवू पाहणाऱ्यांना सत्तेवरून घाली खेचा,असे आवाहन करताना आदिवासींच्या हक्कावर तीळमात्र गदा येऊ देणार नाही. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असा वश्विास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस मत्रिपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, ॲड. संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे, गोरख बोडके, फिरोज पठाण, रामदास घारे, उदय जाधव, धोंडीराम कोल्हे, लकी जाधव, सुनिल वाजे उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, राज्यातील शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यिासाठी शेतक-यांनी सेनेवर वश्विास ठेवला होता. मात्र सेनेने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले, असा आरोप करत भुजबळ यांनी मोदी सरकारवरही तोंडसुख घेतले. मोदी सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी झाला आहे. बारा हजाराहुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरुणांना रोजगार नसल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. देशात जाती धर्मात तेढ नर्मिाण करुन जातीय दंगली घडवण्यिाचा सरकारचा कट असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.  पुणे : बेळगाव सीमाप्रश्नावर आधारित 'मराठी टायगर्स' हा सिनेमा २०१६ ला प्रदर्शित झाला. दुसरीकडे २०१७ मध्ये १२७ देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पोहोचवला. मात्र, त्या मालिकेवर बंदीची याचिका यांच्याच लोकांनी दाखल केली आहे. 

दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा या भूमीत असा उल्लेख व्हायरल व्हिडिओत करायचा आणि मालिकेवर बंदीची याचिकाही यांचीच त्यामुळे हे बेगडी प्रेम कुणाचे, हे आता सर्वश्रुत झाल्याकडेही डॉ. कोल्हे यांनी लक्ष वेधले आहे. यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे माझ्यावर असे आरोप विरोधक करत आहेत. असे डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.सोलापूर : जन्मदात्या आईने आपल्या दोन मुलींना विष पाजून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील ही घटना आहे. विष पाजल्यामुळे दोन्ही मुलींचा मृत्यू झालाय, तर आईवर सध्या उपचार सुरु आहेत. एक मुलगी चार, तर दुसरी दोन वर्षांची होती. आईने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

नान्नज गावापासून काही अंतरावर कृष्णात भोसले यांच्या शेतात कुटुंब राहत आहे. ते शेतमजुरी करून आपली उपजीविका भागवत होते. शनिवारी सकाळी कौटुंबीक कारणावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. याचा राग मनात धरून दुपारी रेष्मा कृष्णा भोसले यांनी आपल्या दोन मुली श्रावणी कृष्णा भोसले (वय 4) आणि श्रेया (वय 2) यांना शेतातील फवारणीसाठी घरात ठेवलेलं कराटे नावाचं विषारी द्रव्य पाजलं.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget