अमोल कोल्हेंविरोधात टीका करताना भान बाळगा : आढळराव पाटील

Image result for आढळराव पाटील

पुणे : आगामी लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचत असताना सोशल मीडियावरही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक जाहीर आवाहन केले आहे. 

यात त्यांनी आपल्या समर्थकांना आपल्या विरोधी उमेदवारावर टीका करताना भान बाळगण्याचे आवाहन केले आहे. अशाप्रकारे आढळराव यांनी अप्रत्यक्षरित्या अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना कार्यकर्त्यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीनिमित्त सोशल मीडियाच्या वापराबाबत काही दिशानिर्देश दिले आहेत. असे असले तरीही राजकीय कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर पातळी सोडून टीका होत आहे. शिरूरमध्येही अशीच स्थिती असून याचा फटका या मतदारसंघातून 15 वर्षांपासून खासदार असलेल्या आढळराव यांनाही बसला आहे. त्यामुळेच त्यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत आवाहन केले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget