शिर्डी लोकसभा मतदार संघातून ऍड संतोष गायकवाड लोकसभा निवडणूक लढविणार

शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डी लोकसभा मतदार संघात प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय प्रत्यक्ष दौरा करत जनतेची मते जाणून घेत शिर्डी लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठक प्रसंगी झाल्याचे ऍड संतोष गायकवाड यांनी सांगितले.


ऍड संतोष गायकवाड हे उच्च शिक्षित असून कायद्याचा अभ्यास ,मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले आहे.तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अहमदनगर उत्तर जिल्ह्यात बागायती क्षेत्र ,उद्योग व्यवसायास पोषक वातावरण असताना युवक मुबंई ,पुणे येथे जात आहेत.

येथील युवकांना याच ठिकाणी काम मिळाले पाहिजे.पांढरी पूल येथील औद्योगिक वसाहती साठी प्रयत्न करणार ,अकोले तालुक्यातील आदिवासी बांधावा साठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानीक पातळीवर युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर देण्याचा प्रयत्न करणार असून विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणार असल्याचे ऍड संतोष गायकवाड यांनी बोलताना सांगितले .

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget