भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष लढणार

Related image

अहमदनगर: औरंगाबादेत काँग्रेसमध्ये पहिली बंडखोरी झाली असताना, आता युतीतही बंडखोरी सुरु झाली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी म्हटलं. शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल जनतेची नाराजी असल्याने, मला ही निवडणूक लढवायची आहे, अशी भूमिका वाकचौरे यांनी घेतली आहे.

भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार असून, सध्या भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्तपदही ते भूषवत आहेत. यावेळी शिवसेनेनेकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. पण शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिलं. त्यामुळे वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. वाकचौरे यांच्या बंडखोरीमुळे शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget