पार्थ पवार आणि लक्ष्मण जगतापांच्या भेटीने भुवया उंचावल्या

Image result for पार्थ पवार

पुणे: मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. आज शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शहरातील तरुण मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरवमध्ये मंडळांच्या भेटीला ते गेले होते. त्यावेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील त्यावेळी मंडळांच्या भेटीसाठी तिथे आले होते. हे दोघेही एकाचवेळी आल्यामुळे उपस्थित मंडळी गोंधळात पडली. दोघांनी एकमेकांची विचारपूस करुन हातात हात दिला.

या दोघांमध्ये इथे कुठलीच राजकीय चर्चा झाली नसली तरी, हे दोघे एकत्र आल्यामुळे पुढची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मावळमध्ये पार्थ पवारांविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रणांगणात आहेत. मात्र श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला लक्ष्मण जगताप यांचा विरोध आहे. ते सध्या नाराज आहेत. स्वत: लक्ष्मण जगताप मावळमधून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी शेवटपर्यंत मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी प्रयत्न केला. पण ही जागा शिवसेनेकडे असल्याने श्रीरंग बारणे यांनाच तिकीट मिळालं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget