रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा भाजपात प्रवेश.मुंबई : भाजपने काँग्रेसला आणखी एक धक्का दिलाय. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.

स्थानिक नगरसेवक, रणजित सिंह यांचे मोठे बंधू समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि इतर नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.

शनिवारी करमाळा येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेना आमदार नारायण पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांची भाजप प्रवेशाबाबत बैठक पार पडली होती. 

सध्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget