राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगरमध्ये दाखल.अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध विषयांवर बैठक होणार आहे. 

राष्ट्रवादीचे नगर दक्षिणेचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विजयाची रणनिती आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून धोरण आखलं जाणार आहे. त्यासाठी खुद्द शरद पवारच अहमदनगरमध्ये आहेत.

नगरमध्ये काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुलासाठी विखे पाटलांनीही बैठका सुरु केल्याचं बोललं जातंय. 

विखे आणि पवार घराण्याचं वैर जुनं आहे. त्यामुळे स्वतः शरद पवारच नगरमध्ये बैठका घेत आहेत. विखे पाटील सध्या काँग्रेसमध्येच आहेत, पण नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget