बहीण बहीण म्हणून जवळ गेलो, पण बहिणीने जबाबदारी घेतली नाही

Image result for महादेव जानकर

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाराजी वर्तवली आहे. महादेव जानकरांनी मुख्यमंत्र्यांना उद्याचा अल्टीमेटम दिला आहे. जानकर आता काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसंच बहीण बहीण म्हणून जवळ गेलो, पण बहिणीने जबाबदारी घेतली नाही, असं म्हणत जानकरांनी पंकजावर निशाणा साधला.

आज सकाळी पुणे येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जानकर म्हणाले, सुजय विखे, रणजित मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत असेल”. शिवसेना-भाजप युतीने रासपला लोकसभा निवडणुकीत डावलल्याने रासपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. यामुळे आज झालेल्या बैठकीत जानकरांनी मुख्यमंत्र्यांना उद्याचा अल्टीमेटम दिला आहे. जानकर आता काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget