भाजपा खासदार दिलीप गांधी बंडाच्या तयारीत

Related image

अहमदनगर: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्याऐवजी पक्षात नव्याने डेरेदाखल झालेल्या डाॅ सुजय विखे पाटील यांच्या गळ्यात भाजपाने उमेदवारीची माळ घातल्याने मतदारसंघातील राजकीय समिकरणे वेगाने बदलली आहेत.

 उमेदवारी डावलल्याने खा.गांधी व त्यांचे समर्थक प्रचंड दुखावले आहेत. समर्थकांच्या वाढत्या दबावातून खासदार दिलीप गांधी आता बंडाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

येत्या रविवारी अहमदनगर येथे मतदारसंघातील गांधी समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात खासदार गांधी पक्ष बदलण्याचा किंवा अपक्ष उमेदवारीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गांधी यांच्या बंडाला दक्षिणेतील भाजपाच्या काही नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. भविष्याच्या राजकारणाच्या गोळाबेरजेत निष्ठावंतांवर अन्याय होण्याआधीच काही नेत्यांकडून योग्य ती तजवीज करण्याची खेळी हाती घेतली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget