विचारवेध

गोतावळ्याचा धागा दिवसेंदिवस नाजूक होत चालला आहे.नात्यांचा विसर पडणं किंवा नाते माहीत असूनही ते न जपणं,समोर आलेल्या नातेवाईकाला पाहुन न पहिल्यासारख करणं हे आजच्या पिढीत बहुतांशी प्रमाणात दिसत आहे.आजची पिढी ही प्रगत तंत्रज्ञानासोबत इतकी गुरफटून गेली आहे की,इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या सानिध्यात राहता-राहता माणूस कृत्रिम मानवासारखा वागायला शिकला आहे.


गोतावळ्यात मनसोक्त नातेसंबंध जपण्यासाठी प्रत्येक जण धडपडतोय पण कुठेतरी कृत्रिम पद्धतीने बनलेल्या या सभोवतालच्या विश्वातुन त्याला बाहेर पडता येत नाहीये.जो आनंद ,समाधान,प्रेम,जिव्हाळा,आदरणीयता आपल्या माणसात असते ती इतर कुठेही नाही.मी,माझे कुटुंब,माझा व्यवसाय,माझ्या मुलांचे भविष्य यात प्रत्येक जण व्यस्त झाला आहे.या सर्वांतून जुन्या नातेसंबंधात जाणे,तिथे वेळ घालवणे आजच्या पिढीला जमत नाही.

पण कधीतरी वेळ काढून जुन्या नातेवाईकात वेळ घालवू बघा,त्यातून मिळणारा जिव्हाळा-प्रेम हे अगणित आनंद देणारा असतो.नात्यांची किंमत ही ते असेपर्यंत खरेतर समजतच नाही.जेव्हा एखादा नातेवाईक आपल्यातून नकळतपणे निघून जातो तेव्ह त्या गोतावळ्याचे महत्व आपल्या लक्षात येते.नाते,नातेसंबंध, नातेवाईक, गोतावळा आपल्यात असतो त्यावेळी आपण माणुसकीच्या दौलतीने श्रीमंत झालेलो असतो.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget