March 2019पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांनी आपला प्रचार धडाक्यात सुरु केला असताना, त्यांच्या मदतीसाठी लहान भाऊ जय पवारही मदतीला धावला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांच्या प्रचारासाठी जय पवार यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पावर हे येथून रणांगणात उतरले आहेत.

पार्थ पवार यांनी उमेदवारी जाहीर होताच, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मतदारासंच्या गाठीभेटी सुरु केल्या. लहान-मोठ्या सभा, मेळावेही घेण्यास सुरुवात केली आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून पार्थ पवार यांनी आज पिपंपरी चिंचवड परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पार्थ पवार यांच्या सोबतीला त्यांचे लहान बंधू जय पवार हेही हजर होते.


नगर |आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व शिर्डीचे अाघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे मंगळवारी (२ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त गर्दी जमवण्यासाठी दुसऱ्या अन् तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत.
परभणी : शहरातील जायकवाडी परिसरात शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. संबंधित नगरसेवकाचे नाव अमरदीप रोडे असे आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.


परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची मध्यरात्री कुऱ्हाडी तीक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही निर्घृण हत्या बघून परभणी जिल्हा हादरून गेला आहे. परभणीत शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून अमरदीप रोडे यांच्याकडे बघितले जात होते,

परंतु त्यांची हत्या ही राजकीय पार्श्वभूमीवर झाली की गुन्हेगारी पार्श्वभूमीवर हे मात्र अद्याप कळलेले नाही. अमरदीप रोडे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही हत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर झालेली आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण होतो.

पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला असून रोडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येनंतर या हत्येत सहभागी असणारे २ आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनीही किरकोळ कारणातून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या या हत्येमागे राजकीय कारण आहे की अन्य काही हे मात्र तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरल्यापासून विविध गटातटात काम करणाऱ्या दलित संघटनांना एकत्रित आणण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने मतांचा ओघ आणण्यासाठी बसपनेही उमेदवारी मागे घेतली. बहुजन समाज पक्षाचे सोलापूर येथे 3 नगरसेवक आहेत. 


शिवाय प्रत्येकवेळी बसपकडून येथे लोकसभा लढवली जाते. मात्र, आता प्रकाश आंबडेकरांना पाठिंबा दिल्यामुळे आंबेडकरी चळवळीची ताकद वाढलेली दिसत आहे. बसपच्या पाठोपाठ आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्लीत झालेल्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सोलापुरात नुकतेच नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेत जाऊन त्यांचे कौतुक केले होते. त्यामुळे भाजपशी त्यांचे सुत जुळल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदार संघात माकपच्या नरसय्या आडम यांच्या माकपच्या हक्काची मते भाजपला मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीत माकपने प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी 10 एप्रिलला बारामतीत येणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी ते भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतील. बारामतीतून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे मैदानात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीने नवनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.

मोदींच्या या सभेमुळे बारामतीमधील लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष वेधले जात आहे. ही लढाई एकतर्फी नसून दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न होतील हेच यातून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे 2014 मध्येही मोदींनी बारामतीत जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी मोदींनी पवार काका-पुतण्यावर जोरदार टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी दुसरीकडे बारामती मतदारसंघात गावा-गावांमध्ये जाऊन जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त रात्री साता-यातील कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर असंख्य कार्यकर्ते आ. शिवेंद्रसिहराजेंना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. रात्री उशीरा वाढदिवसाची गर्दी संपत आली असतानाच काही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. त्यामुळे रंगात आलेला वाढदिवसाचा कार्यक्रम अखेर शिवेंद्रसिहराजेना आटोपता घ्यावा लागला.
शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त जावळी तालुक्यातील एका व्यवसायिकाने कार्यकर्त्यांसाठी दुपारी कार्यक्रम ठेवला होता. त्यानंतर सायंकाळी पाचनंतर दुस-या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिहराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. तब्बल पाच तास शिवेंद्रसिहराजे भोसले मंचकावर उभे राहून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते.

रात्री दहा वाजणाच्या सुमारास फिरोज पठाण, शैलेंद्र विजय देसाई व काही कार्यकर्त्यांमध्ये मंचकावर थांबण्यावरून धक्काबुक्की झाली. हे प्रकरण आणखी चिघळले आणि आमदारप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. परंतु वेळीच ज्येष्ठ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे ही मारामारी आटोक्यात आली. 

ठेकेदारी व गटबाजीमुळे हा वाद निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असतानाही असा प्रकार घडला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस यंत्रणा काय तपास करणार याची चर्चा सुरू झाली आहे.शिर्डी : काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अडचणीत सापडले आहेत. कांबळेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूर येथील विखे समर्थक कार्यकर्त्यांनी कांबळेंना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये झालेल्या बिघाडीनंतर शिर्डीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे.

काँग्रेस नेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव आणि नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठी बिघाडी झाली आहे. अहमदनगरमध्ये कालच काँग्रेसने भाजपाचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये भारतीय वायू सेनेचं लढाऊ विमान मिग 27 कोसळलं आहे. सध्या या झालेल्या अपघाताबद्दल अजून काही माहिती समोर आलेली नाही.

शिवगंजजवळील घराना गावात हे विमान कोसळलं आहे. आपल्या रुटीन मिशन दरम्यान या विमानाचा अपघात झाला आहे. याआधीही राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात वायूसेनेच्या मिग 21 विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात पायलटने उडी मारुन स्वत:चा जीव वाचवला होता.

राजस्थानच्या बिकानेर येथे भारतीय वायूसेनेचं मिग 21 विमान कोसळलं आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणाले, “बीकानेरजवळ एअरबेस उड्डाण घेत असताना विमानाला एक पक्षी धडकला. यामुळे हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच एअरफोर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली”.

भारतीय वायूसेनेचं लाढाऊ विमान मिग-21 बिकानेर येथून वायूसेनेच्या नाल हवाई अड्डयावरुन नियमीतप्रमाणे उड्डाण घेतल्यावर त्याचाही अपघात झाला होता. लढाऊ विमान मिग-21 बिकानेरपासून अंदाजे 12 किलोमीटर लांब शोभासर येथे कोसळलं होतं. या अपघातात पायलटने उडी मारुत स्वत:चा जीव वाचवला होता.नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्यात भेटीगाठी घेतल्या. प्रचारफेरी काढून कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या.

घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे जगताप यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी आमदार राहुल जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब लगड, प्रशांतदादा नलगे, बापूसाहेब साके, भास्करराव दरेकर, नितीन डुबल, चंद्रकांत काटे, लालासाहेब पानसरे, हंबीरमामा पवार, अनिलभाऊ बारगुजे, शरदजी खोमणे, अमोलदादा खोमणे, शरदजी जगताप, लाला पानसरे, रमेशदादा कळमकर आदी उपस्थित होते.


चौंडी येथून आठ दिवसांपूर्वी आरती सायगुंडे (वय १७ वर्षे) ही तरुणी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. मात्र, आठ दिवसांनंतर तिची हत्या वडील व मामानेच केल्याचे व हा 'ऑनर किलिंग'चा प्रकार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

आपली मुलगी मोबाइलवर सतत कुणाशी तरी बोलते, दुसऱ्याच्या मोटरसायकलवर फिरते, त्यामुळे हिचे प्रेमप्रकरण असावे... असा संशय घेऊन तिच्या वडिलांनीच पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. खुनानंतर मुलीच्या मामांच्या मदतीने मृतदेह जाळून टाकला व पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला गेला. या प्रकरणी वडील पांडुरंग श्रीरंग सायगुंडे, मामा राजेंद्र जगन्नाथ शिंदे, ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे (दोघे रा. निमगाव डाकू, ता. कर्जत) या तिघांना अटक करण्यात आली आहे.प्रतिनिधी | नगर

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वांबोरी फाटा येथे जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वांबोरी फाटा येथे रात्री सापळा लावला होता.

दरोडेखोरांची टोळी नगर-मनमाड रस्त्याने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा सापळा लावण्यात आला होता. वांबोरी फाटा येथे पथकाने या टोळीला ताब्यात घेतले. कुमेल जुनानी, शहाबाज सलीम शहा, समीर शहा, अरबाज शहा अशी नावे या चार जणांची आहेत. अनिल साळवे ,राहुल भालेराव अशी दोन जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाली.


प्रतिनिधी | नगर

सावेडी उपनगरातील वैदुवाडी भागात सुमारे ८४ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने पोलिस प्रशासनाचे आर्थिक घडामोडींकडे लक्ष आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. परंतु, ही रक्कम एका फायनान्स कंपनिकडून ही रक्कम दैनंदिन व्यवहाराची असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ही रक्कम दैनंदिन व्यवहाराची व अधिकृत असल्याचेही सांगण्यात येत आहे.


नगर | नगर औरंगाबाद रस्त्यावरील नेवासा तालुक्यातील पांढरीपुल येथील अन्न व औषध प्रशासन व सोने पोलिसांनी एक लाखाचा गुटखा पकडला याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून, गोविंद सुभाषचंद्र लोया असे संशयित आरोपीचे नाव आहेे.

नगर शहर राज्यात अन्न व औषध प्रशासनाने गुटखाबंदी केली असताना नगर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम पद्धतीने गुटख्याची विक्री होते. प्रामुख्याने नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुटखा विकला जातो.


मुंबई / प्रतिनिधीः
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या भाजपला मत देवू नका, असे आवाहन करत देशभरातील 100 हून अधिक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते भाजपाविरोधात एकवटले आहेत. ‘आर्टिस्ट युनायटेड इंडिया’ अंतर्गत हे कलाकार एकत्र आले आहेत.

‘आर्टिस्ट युनायटेड इंडिया’ने एक संयुक्त पत्रक प्रसिद्ध करत जनतेला आवाहन केले आहे. निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन, दिग्दर्शक वेत्री मारन, दिग्दर्शक मिरांशा नाईक अशा तब्बल 100 हून अधिक फिल्ममेकर्सनी या पत्रकावर सह्या केल्या आहेत. 2014 ला निवडून दिलेल्या या भाजप सरकाराने देशाला युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडले. समाजात हिंदू- मुस्लिम तेढ वाढली.

 मागासवर्गीयांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे या सरकारने कायम दुर्लक्ष केले, अशी टीका या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी ही लोकसभा निवडणूक अखेरची संधी आहे. त्यामुळे जनजागृती करणे महत्त्वाचे आहे, असेही या कलाकारांचे मत आहे.

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कारमध्ये स्फोट झाला त्यावेळी बाजूने जवानांचा ताफा प्रवास करत होता. या स्फोटामुळे जवानांच्या वाहनाचेही काहीसे नुकसान झाले आहे. 

दरम्यान, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, सीआरपीएफच्या सूत्रांनी जवानांच्या वाहनाला नुकसान पोहोचल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. असे असले तरी या स्फोटानंतर सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आज दुपारी सीआरपीएफचा ताफा बनिहाल परिसरातून जात असताना महामार्गावर एक कार उभी होती. ज्यावेळी सीआरपीएफचा ताफा कारच्या बाजूने गेला तेव्हा कारमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि कार पूर्णपणे उद्धवस्त झाली. 

या स्फोटाचा धक्का सीआरपीएफच्या एका वाहनाली पोहोचला. पण ताफ्यातले सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान कार पूर्णपणे उद्धवस्त होताच जवळच उभा असलेल्या चालकाने पळ काढला.


श्रीगोंदा - नगर सह्याद्री - बारामतीकर हे फसवाफसवी राजकारणात माहिर आहेत. श्रीगोंदा तालुक्यालाही त्यांनी सावत्रपणाची वागणूक दिली. मी पक्षात असतानाही या तालुक्याच्या विकास कामांच्या फायली प्रलंबीत ठेवल्या. राष्ट्रवादीत घेवून डॉ. सुजय विखेंनाही फसवण्याचे त्याचे मनसूबे होते. 


म्हणुनच त्यांना भाजपात येण्यास सल्ला आपण दिला. सुजयच्या प्रचारात आई वडील नाहीत हा राष्ट्रवादीच्या घाणेरड्या राजकारणाचा परिपाक आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. दरम्यान श्रीगोंदा सुजयच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल अशी ग्वाही दिली.


महाराष्ट्रात तपमानात वाढ होणार असून दुपारी बारा वाजेपासून साडेतीन वाजेपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अचानक वाढलेल्या तापमानाचा प्रभाव उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

अचानक वाढलेल्या तपमानात कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबततही नाशिक जिल्हा प्रशासनाने पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. उष्माघाताचा धोका असल्यामुळे घराबाहेर गरज असेल तेव्हाच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि प्राधिकरणाकडून आज काही पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले असून यामध्ये सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आठवड्यात नाशिकमधील कमाल तापमान ४० अंश स्थिर आहे. त्यामुळे प्रचंड उष्णतेची लाट जिल्ह्यात आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही. पुण्यातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पेच सुरू आहे. 

प्रवीण गायकवाड यांच्या नावाला काँग्रेसमधील निष्ठावंताचा विरोध आहे. मात्र, खर्गेंच्या उपस्थितीत गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने त्यांच्या समर्थकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी मिळेल, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त करण्यात येतोय.


सांगली : आघाडीतील सांगली आणि रावेरच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. सांगलीतून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत. तर राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडलेल्या रावेरमध्ये काँग्रेसने उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान सांगलीतून विशाल पाटील हे 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे विशाल पाटील आता स्वाभिमानाचे बॅट्समन म्हणून मैदानात उतरणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरुन धुसफूस सुरु होती. खासदार राजू शेट्टी हे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती.

काँग्रेसने ही जागा स्वाभिमानीला सोडल्याने वसंतदादांचं कुटुंब, माजी खासदार प्रतिक पाटील हे काँग्रेसवर नाराज झाले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यावेळी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला. पण विशाल पाटील यांचं बंड थोपवण्यात काँग्रेस आणि स्वाभिमानीला यश आलं आहे.मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांना लागू असेल. 

राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था इतर विभागकरीता ही सुट्टी लागू राहील.

पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 2019 रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यादिवशी संबंधित मतदार संघात सार्वजनिक सुट्टी राहील. बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दुसऱ्या टप्प्यातील दहा मतदारसंघांसाठी 18 एप्रिल 2019 रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील.

तिसऱ्या टप्पयातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा 14 मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मदतानाच्या दिवशी सुट्टी राहील. 

तसेच चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदारसंघात 29 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी राहील.

केंद्र शासनाच्या अखत्यारितातील स्वायत्त महामंडळे, प्रतिष्ठाने आदींनाही या अधीसूचनेनुसार सुट्टी लागू राहील, असेही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी जाऊन सचिनने पवारांची भेट घेतली.
सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षाचे राजकीय नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. 

एकीकडे ही स्थिती असताना सचिन तेंडुलकरने शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने, या भेटीचे अंदाज बांधणं सुरु झालं आहे. या भेटीचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सचिन जवळपास अर्धा तास पवारांच्या घरी होता. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती देणं सचिनने टाळलं.

Image result for विनायक राऊत

सिंधुदुर्ग : विनायक राऊत शनिवारी रत्नागिरी येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याचे निमंत्रण देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी भाजपा तालुका कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना योग्य तो मानसन्मान दिला. 

मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न अद्याप कायम असल्याने या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

 त्यानुसार शनिवारी विनायक राऊतांचा अर्ज भरण्याच्या कार्यक्रमावर भाजपाचे मालवण तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहिष्कार टाकणार असून केवळ तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहून कार्यकर्त्यांची भुमिका शिवसेनेसमोर मांडणार आहेत, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली

Image result for बच्चू कडू

मुंबई : दारू दुकानांसमोर दूधवाटप करून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने यवतमाळमध्ये अनोख्या शैलीत प्रचाराला सुरुवात केली. या वेगळ्या प्रचाराची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना प्रहार संघटनेने यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याच प्रचाराचा शुभारंभ आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत दारू दुकानासमोर दूधवाटप करून करण्यात आला.

Related image

पंढरपूर : भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण भाजपमध्ये असणारे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. 

यासाठी उद्या दुपारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपवर दबाव टाकून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय.

माढा लोकसभा मतदारसंघातून अनेक चर्चा आणि सल्ला-मसलत नंतर भाजपकडून फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. निंबाळकर यांच्या समविचारी आघाडीत असणारे भाजपचे धनगर नेते उत्तम जानकर यांना आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र राजकीयदृष्ट्या निवडून येण्याची क्षमता म्हणून निंबाळकर उमेदवार ठरले.

Image result for वंचित बहुजन आघाडी

सोलापूर : भारिप आणि एमआयएम यांच्या वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह ठरलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कप बशी या चिन्हावर निवडणूक लढवतील. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत चिन्ह म्हणून कप बशीला मान्यता देण्यात आली. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापुरातून लढत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघांमधून लढण्याचा निर्णय घेतलाय. वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा लढवण्यात येणार आहेत. यापैकी औरंगाबादची जागा एमआयएम लढवणार आहे. एमआयएमने विद्यमान आमदार इम्तियाज जलील यांना औरंगाबादमधून उमेदवारी दिली आहे.

Image result for बीएसएनएल

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल या टेलिकॉम कंपनीने नवा प्लॅन आणला आहे. बीएसएनल आता ग्राहकांना फक्त 19 रुपयांत तब्बल 2 जीबी इंटरनेट देणार आहे. याचा फायदा बीएसएनएल वायफाय हॉटस्पॉट वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.

सध्या देशभरात बीएसएनएलचे 16 हजार 300 ठिकाणी जवळपास 30 हजार 400 वायफाय हॉटस्पॉट आहेत. यातील अनेक हॉटस्पॉट ग्रामीण भागात असल्याने त्याचा उपयोग विद्यार्थी, नागरिकांना होतो. या हॉटस्पॉटचा वापर वाढावा या दृष्टीने बीएसएनएलद्वारे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे व्हाऊचर काढण्यात आले आहेत. या व्हाऊचरची किंमत 19 रुपये, 39 रुपये, 59 रुपये, 69 रुपये अशी आहे. यात 19 रुपयाच्या व्हाऊचरमध्ये 2 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. याची वैधता फक्त दोन दिवस असेल.


बीड : महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात बीडच्या जागेसाठी मतदान होणार आहे. विद्यमान खासदार असलेल्या डॉ. प्रितम मुंडे यांना तब्बल 35 उमेदवारांचं आव्हान असेल. 

उमेदवारी अर्ज छाननीनंतर आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बीडमध्ये एकूण 36 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात 26 उमेदवार अपक्ष आहेत आणि 10 उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे आहेत. अपक्ष उमेदवारांमुळे प्रशासनाचा भार वाढणार आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून प्रितम मुंडे या उमेदवार आहेत. एकीकडे राष्ट्रवादीकडून पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी कंबर कसली आहे. तालुकानिहाय बैठका ते घेत आहेत. तर प्रितम मुंडेंनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने आपली रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
भाजपकडून रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आता रावेरमधून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीने रावेरमधून नितीन कांडेलकरांना उमेदवारी दिली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रावेरच्या जागेवर भाजपच्या रक्षा खडसेंचा विजय झाला होता. 

त्यामुळे यावेळी येथे कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावची जागा आपल्याकडे ठेवली आहे. भाजपने येथून स्मिता वाघ यांना तर राष्ट्रवादीने गुलाबराव देवकर यांना मैदानात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडीने जळगावमधून अंजली रत्नाकर बाविस्कर यांना उमेदवारी दिली आहे.


अहमदनगर, दि. 29- 37 - अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना जारी करण्यात आल्याच्या दुस-या दिवशी एकूण 23 जणांनी 35 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. पहिल्या दिवशी एकूण 21 जणांनी 39 अर्ज नेले होते. दुस-या दिवशीही एकही अर्ज अदयापपर्यंत दाखल करण्‍यात आलेला नाही

37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना गुरुवारी जारी झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली. या लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासाठी विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय मोरे यांची नियुक्ती केली आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुस-या दिवशी अर्ज नेलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे; (कंसात अर्जांची संख्या) - 1. येंडे श्रीराम जनार्दन, प्रोफेसर कॉलनी,नगर (1), 2. घोडके गौतम काशिनाथ, सिद्धार्थनगर, श्रीगोंदा, (1), 3. गांगुर्डे एकनाथ बाबुराव, वारुळाचा मारुती, नालेगांव, नगर (1), 4. पालवे आसाराम दत्‍तात्रय, माळीवाडा, अहमदनगर (1), 5. सुपेकर ज्ञानदेव नरहरी, कुळधरण, ता. कर्जत (1), 6. बताडे धिरज मोतीलाल, पाथर्डी, ता. पाथर्डी (1), 7. चितळे गोरक्ष रावसाहेब, चितळवाडी, ता. पाथर्डी (1), 8. चितळे लक्ष्‍मण आनंदराव, माळी चिंचोरा, ता. नेवासा (1), 9 . थोरात नितीन माधवराव, रासनेनगर, सावेडी, नगर (1), 10. ढोकणे रामकिसन गोरक्षनाथ, उंब्रे, ता. राहुरी (2), 11. देशमुख अविनाश इंद्रभान यांनी (सावंत संजय दगडु) (1), 12. गायकवाड एकनाथ हरिभाऊ, बागडेमळा, नगर (2),13. धाडगे कारभारी रामचंद्र, नजीक चिंचोली, ता. जि. नगर (1), 14. शेख फारुख इस्‍माईल, बोल्‍हेगांव,नगर (3), 15. प्रा. बेरड भानुदास रतन, दरेवाडी, ता. जि. नगर यांनी (डॉ. विखे सुजय राधाकृष्‍ण, विळद, नगर), (2), 16. बाचकर अण्‍णासाहेब रंगनाथ, राहुरी (2), 17. साळवे मधुकर मोतीराम, राहुरी खुर्द, राहुरी (1), 18. यादव उमाशंकर श्‍यामबाबु, बोल्‍हेगांव, नगर (1), 19. शेडाळे अशोक भाऊसाहेब, जहागीरदार चाळ, बुरुडगांव रोड, नगर यांनी (संग्राम अरुणकाका जगताप, भवानीनगर, मार्केटयार्डमागे, नगर), (3), 20. औटी जयराम बन्‍सी, मोकळ ओव्‍हळ, ता. राहुरी (1), 21. सातपुते दिलीप नानासाहेब, भुषणनगर, केडगांव, नगर यांनी (डॉ. विखे सुजय राधाकृष्‍ण, विळद, नगर ), (2), 22. मोहित विजय यादव, सावेडी, नगर यांनी (अॅड. सावंत कमल दसरथ, हिंगणी दुमाला, श्रीगोंदा), (3), 23. पोखरकर सुभाष रावसाहेब, संगमनेर (2)


माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेले रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे. 

सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.मेट्रोच्या कामादरम्यान पुण्यातील स्वारगेट परिसरात 2 भुयारं आढळली आहेत. जमिनीखाली पक्क्या विटांचा उपयोग करुन ही भुयारं बांधण्यात आली आहेत. मात्र, ही भुयारं नेमकी कधी आणि कोणी बांधली याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

स्वारगेट येथील राजर्षी शाहू महाराज बस स्थानकाच्या समोरील बाजूला पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु होते. त्यावेळी बस स्थानकाची बाजू खचली. 

असाच खड्डा त्याच्या दुसऱ्या बाजूला घेत असताना तेथेही खड्डा पडला. त्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पाहणी केली असता या खड्ड्यांमधून पूर्व, पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचे पाहायला मिळाले.गांधीनगर : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलला गुजरात हायकोर्टाने दणका दिलाय. हायकोर्टाने हार्दिक पटेलला निर्दोष मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे. 

यामुळे त्याला निवडणूक लढता येणार नाही. अमरेली किंवा जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती.

हार्दिक पटेलवर 2015 मध्ये मेहसाणा दंगली प्रकरणी खटला सुरु आहे. कनिष्ठ न्यायालयाकडून हार्दिक पटेलला शिक्षाही सुनावण्यात आली होती. 

या निर्णयाविरोधात हार्दिक पटेलने हायकोर्टात आव्हान दिलं होतं, ज्यावर सुनावणीस नकार देत कोर्टाने निर्दोष मुक्त करण्याची मागणी फेटाळली. कोर्टाच्या या निर्णयामुळे लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार हार्दिक पटेलला निवडणूक लढता येणार नाही.अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी जाहीर केली.

नगर जिल्हा काँग्रेसने जाहीर केलेल्या धक्कादायक भूमिकेमुळे बाळासाहेब थोरात गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. शिवाय, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत लढत असताना, नगरमध्ये मात्र जिल्हा काँग्रेसने थेट भाजपला मदत करण्याची घोषणा केली आहे.

Image result for संजीव भोर

अहमदनगर: सकल मराठा समाजाचे समन्वयक संजीव भोर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, हितचिंतक, समर्थक, समविचारी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. 

प्रस्थापितांच्या घराणेशाहीने शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली. म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात ही स्वाभिमानाची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले .

अहमदनगरमध्ये सर्व संघटना कार्यकर्त्यांचा मेळावा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील तसेच नगर जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते, अशा मान्यवरांच्या उपस्थितीत संजीव भोर यांनी निवडणूक लढवावी, असे चर्चेअंती ठरले.


अहमदनगर : भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. नगर दक्षिणमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने, विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी नाराज झाले आहेत.

 त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले होते. त्यानंतर आज स्वत: सुजय विखे पाटील यांनी दिलीप गांधींची भेट घेतली. त्यामुळे दक्षिण नगरमधील राजकीय वर्तुळात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत.

डॉ. सुजय विखे पाटील आणि दिलीप गांधी यांच्यात जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. सदिच्छा भेट असल्याचे सुजय विखे पाटलांनी या भेटीनंतर सांगितले असले, तरी दिलीप गांधींची नाराजी दूर करण्यात विखे पाटील पिता-पुत्राला यश आल्याची चर्चा आहे.


सातारा : राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाची फसवणूक केली आहे. या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी एकाही जागेवर धनगर समाजातील नेत्याला उमेदवारी देखील दिली नाही. म्हणून माढ्यासह 10 जागांवर धनगर समाजाचे उमेदवार निवडणूक लढतील आणि जिंकतील, असा विश्वास धनगर युवा नेते जगन्नाथ जानकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी माढा अपक्ष उमेदवार सचिन पडळकर, विनायक मासाळ, अण्णासाहेब सुळ, सचिन होनमाणे, पप्पू शिंगाडे, शिवराज पुकळे, अक्षय वणरे यांच्यासह युवक उपस्थित होतेमुंबई : काँग्रेस महाआघाडीत बंडाळी वाढल्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी शड्डू ठोकले आहेत. ३० मार्च रोजी गावीत यांनी नवापूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा विचारविनिमयासाठी खास मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. यामुळे नंदुरबार काँग्रेसचे उमेदवार के.सी.पडवी यांची डोकेदुखी वाढली आहे.

भरत गावीत यांना उमेदवारी नाकारल्यामुळे अन्याय झाल्याची भावना बनलेला हा समर्थकांचा समूह भरत गावीत यांना अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह करीत आहे. परिणामी काँग्रेस पक्षाचे जाहीर झालेले उमेदवार के.सी. पडवी यांची एक मोठी फळी विभागली जाईल हे स्पष्ट आहे. 


त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीत सुद्धा भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आणि आतून खिंडार पाडायला उत्सुक असलेले कार्यकर्ते सुद्धा भरत गावीत यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देऊ शकतात अशीही चर्चा सुरु आहे. ३० मार्चच्या मेळाव्यानंतर या अपक्ष उमेदवारी बद्दलचे चित्र स्पष्ट होईल. मात्र या प्रकारामुळे काँग्रेसपक्षश्रेष्ठी गावितांची कशी समजूत काढतात यावर बरेच काही अवलंबून आहे.


जामखेड - अल्पवयीन युवतीचा मृतदेह कुजलेल्या व जळालेल्या अवस्थेत पालकमंत्री राम शिंदे यांच्या चोंडी गावात गुरुवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली. आरती पांडुरंग सायगुडे (वय १७) असे तिचे नाव असून ती चोंडीतील रहिवासी आहे.

या घटनेमागे घातपात असल्याची चर्चा आहे. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. पोलिसांच्या अगोदर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले होते.

पांडुरंग सायगुडे यानी २४ मार्चला आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे हे गाव आहे. आरती ही कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. तेथूनच ती आठ दिवसांपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह चोंडीतील सायगुडे वस्तीजवळ गोवर्धन हरिभाऊ शिंदे यांच्या शेताजवळील तलावाच्या परिसरात सापडला. काही भाग कुत्र्यांनी खाल्ला आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून तो कुजलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.नगर : पत्नीच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा असल्याच्या कारणावरून पाच वर्षांच्या मुलाला विहिरीत ढकलून त्याचा खून करणारा सावत्र बाप वसंत रोडाबा पवार याला जन्मठेपेची व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनाविण्यात आली. कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.

आरोपी वसंत रोडाबा पवार याने निर्मला हिच्याबरोबर दुसरे लग्न केले होते. निर्मला हिला पहिल्या पतीपासून दादू पवार पाच वर्षांचा मुलगा होता. पहिल्या नवऱ्याचा मुलगा असल्याच्या कारणावरून वसंत पवार हा मुलाचा रागाराग करत होता. रात्री झोपेत असलेला मुलगा दादू पवार याला वसंत पवार याने त्याच्या अंथरुणातून उचलून घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीच्या पाण्यात ढकलून त्यास जीवे ठार मारले होते.


नगर :- भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी म्हणजे माझीच उमेदवारी आहे. या पक्षामध्ये त्यांना आणण्यासाठी माझेच प्रयत्न होते. समोर कोण उभे आहे, यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करायचे, हाच माझा निर्धार आहे,' असे प्रतिपादन राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी येथे केले.


'महाभारतात श्रीकृष्णापुढेही संकट उभे राहिले होते. पण कर्तव्याला प्राधान्य देणे हा आपला विचार आहे, त्यामुळेच डॉ. विखेंना विजयी करण्याचे आवाहन सर्वांना करतो,' असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर तालुक्यातील शेंडी येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात कर्डिले यांच्यासह माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉ. विखे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मतदारांशी संवाद साधला. सभापती विलास शिंदे, उपसभापती रेवणनाथ चोबे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रोहिदास मगर, संचालक संदीप कर्डिले, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget