बैलगाडा संघटनेची ‘पेटा’ संस्थेवर बंदीची मागणी


पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटवावी, यासाठी बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार असून त्याचप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने ‘पेटा’ संघटनेचा निषेध करत या प्राणीप्रेमी संस्थेवर बंदीची मागणी केली आहे.
या आंदोलनात बैलगाडी शर्यत संघटनेचे पदाधिकारी आणि राज्यभरातील सदस्य बैलगाड्या घेऊन सहभागी होतील, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. बैलगाडा शर्यत केंद्र आणि राज्य सरकारने पुन्हा सुरु करण्यासाठी योग्य आणि ठोस पावले उचलावीत, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची ‘पेटा’ या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या संघटेनवरच बंदी घालावी ही मागणी आहे. बैलगाड्या शर्यतींवर बंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या पेटाचा निषेध करण्यात येत आहे.
बैलगाडी शर्यतीवर बंदी घालत शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला असल्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य शासनाने बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेत सर्व अडथळे दूर करावेत, अशी मागणीही या आंदोलनाद्वारे केली जाणार आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget