Latest Post
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पश्चिम मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी जाहीर केली आहे.

“राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही. मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही.” असे काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले.


“मुंबई काँग्रेसमध्ये आता वाद होणार नाही, अशी अपेक्षा आहे. कारण आधी ते आरोप करायचे माझ्यावर. आता त्यांनी कोणावर आरोप करण्याची वेळ येऊ देऊ नये. त्याची काळजी सध्याच्या नेतृत्वानं घेण्याची गरज आहे.” असे म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला.कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीतील हल्ल्यानंतर कोलकात्यात प्रचाराचा कालावधी कमी करण्यात आलाय. यावरुन ममता दीदींनी भाजपवर आरोप करत, हा मोदी-शाह यांचा निर्णय असल्याचं म्हटलंय. तर भाजपसाठी त्यांनी एक्झिट पोलही सांगितलाय. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचं ममता म्हणाल्या.

आंध्र प्रदेश 0…. तामिळनाडू 0… महाराष्ट्र 20.. 200 जागा गेल्या, असं म्हणत ममतांनी भाजपवर टीका केली. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशातील आठ राज्यांमध्ये 59 जागांसाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगाल हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. कारण, 2014 च्या निवडणुकीत इथे भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे दुसरीकडे होणारं नुकसान बंगालमध्ये भरुन काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

अमित शाह यांच्या रॅलीत झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराची वेळ गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत केली. शुक्रवारी सायंकाळी प्रचार संपणार होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ममतांनी जोरदार टीकाही केली. भाजपने टीएमसीच्या कार्यकर्त्यांना गुंडांची उपमा दिली आहे, तर ममतांनीही आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय.


नवी दिल्ली : एक राजकीय नेता म्हणून प्रतिमा सुधारण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना गेल्या काही वर्षात यश आलंय. पण एका चुकीचाही या सर्व प्रयत्नांना कसा फटका बसतो ते एका उदाहरणातून समोर आलंय. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘स्मार्ट’ टीका केली होती. याचं कौतुकही झालं, पण ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या उत्तरानंतर राहुल गांधींचा डाव त्यांच्यावरच उलटला.

राहुल गांधींनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आणि इंग्रजी शब्दकोशात एका नव्या शब्दाचा समावेश झाल्याचं सांगितलं. याबाबतचा एक स्क्रीनशॉटही त्यांनी टाकला होता. या पोस्टमध्ये त्यांनी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या वेबसाईटचं पेजही शेअर केलं होतं, ज्यात ‘मोदीलाई’ ( Modilie ) हा शब्द होता. या शब्दाचे तीन अर्थ देण्यात आले होते. सत्य सतत बदलणारा, सवयीनुसार सतत खोटं बोलणे आणि विचार न करताच खोटं बोलणे असे तीन अर्थ या शब्दाचे होत असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं होतं.सांगली May 16, 2019 at 9:00 pm
818 Views0


सांगली : कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या मुलाला मगरीने पाण्यात ओढल्याची घटना सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज गावात घडली आहे. आकाश मारुती जाधव असं या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे. दुपारच्या वेळी आकाशची बहीण नदीच्या काठावर कपडे धूत होती. त्यावेळी आकाश पाण्याच्या जवळ बसला असताना मगरीने अचानक हल्ला केला आणि त्याला पाण्यात ओढलं.

मगर आकाशच्या शरीराला एक तास तोंडामध्ये घेऊन पाण्यात फिरत होती. याची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि वन विभागाकडून मुलाचा युद्धपातळीवर शोध घेण्यात आला. पण त्याला शोधण्यात अजूनही यश आलेलं नाही. आकाशचे वडील नदी किनारी असलेल्या विटभट्टीवर काम करतात.

कृष्णा नदीपात्रात मगरींचा प्रजननकाळ सुरु आहे. सकाळीही नर आणि मादी मगरींची प्रणयक्रीडा सुरु असल्याचं दिसून आलं होतं. गुडघाभर पाण्यातही मगरींचा वावर दिसल्याने आसपासच्या लोकांनी तिथून पळ काढला. पण या लहानग्याला त्याची माहिती नसल्याने तो काठावरच बसून होता. दुपारच्या सुमारास नदी काठावर येऊन मगरीने मुलाला ओढून नेलं आणि काही वेळाने सोडलंही. पण हा मुलगा नदीच्या पाण्यात पडल्याने या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाने मुलाचा शोध घेतला, पण त्याला शोधण्यात अजून यश आलेलं नाही.

Image result for साध्वी प्रज्ञा सिंह
नवीदिल्लीः नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील, या भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल, असे भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी म्हटले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय पक्षांकडून भाजपवर टीका होऊ लागल्यानंतर नरसिंहराव यांनी माफीची मागणी केली आहे.

Image result for साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ: नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहील असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. नथुरामला दहशतवादी ठरवणार्‍या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

भोपाळमधून साध्वी प्रज्ञासिंह या निवडणूक लढवत आहेत. हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले आहे. अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे म्हटले होते. त्यानंतरही वाद निर्माण झाला होता. नथुरामबाबत प्रश्‍न विचारला असता प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामला देशभक्त म्हटले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget